-->

संविधानामुळेच आपण मुक्त श्वास घेऊ शकतो: सुनिल निकम

संविधानामुळेच आपण मुक्त श्वास घेऊ शकतो: सुनिल निकम

 


साप्ताहिक सागर आदित्य/

संविधानामुळेच आपण मुक्त श्वास घेऊ शकतो: सुनिल निकम


जिल्हा परिषदेत संविधानाच्या उद्देशपत्रिकेचे वाचन!

वाशिम दि, 26 :


भारतीय संविधानामुळे आपण मोकळा श्वास घेऊ शकतो यासाठी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांप्रती कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल निकम यांनी केले.


जिल्हा परिषदेच्या वसंतराव नाईक सभाग्रहात आज  संविधान दिन  साजरा करण्यात आला. यावेळी संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.

यावेळी जि.प. च्या समाजकल्याण विभागाच्या सभापती वनिताताई सिध्दार्थ देवरे, जिल्हा परिषद सदस्या कल्पनाताई राऊत,

मुख्य लेखा व वित्त अधिकारी तुषार मोरे, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डाॅ. विनोद वानखडे, जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक गजानन वेले, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे,  महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे, शिक्षणाधिकारी रमेश तांगडे, कृषी अधिकारी बंडगर, उप शिक्षणाधिकारी गजानन डाबेराव, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता अतुल साळुंखे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी संविधान दिनानिमित्त उद्देश पत्रिकेचे सामुहिक वाचन केले. प्रभारी सीईओ निकम यांनी संविधान दिनाचे महत्व विषद केले. सभापती वनिता देवरे आणि जि.प. सदस्य कल्पना राऊत यांनी संविधान दिनानिमित्त उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. 


26/11 च्या शहिदांना अभिवादन!

 26/ 11 च्या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या वीर जवानांचे यावेळी स्मरण करुन त्यांना सामुहिकपणे आदरांजली अर्पण करण्यात आली.

---***---

राम शृंगारे,

जनसंपर्क अधिकारी जिल्हा परिषद वाशिम.


 

0 Response to "संविधानामुळेच आपण मुक्त श्वास घेऊ शकतो: सुनिल निकम "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article