-->

बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचा ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण करावा  माविच्या उत्पादित वस्तू व प्रदर्शनाचे उद्घाटन

बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचा ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण करावा माविच्या उत्पादित वस्तू व प्रदर्शनाचे उद्घाटन

 


साप्ताहिक सागर आदित्य 

बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचा ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण करावा

माविच्या उत्पादित वस्तू व प्रदर्शनाचे उद्घाटन


वाशिम  बचत गटांच्या माध्यमातून महिला ह्या विविध वस्तू, साहित्य व पदार्थाचे उत्पादन करण्यास सक्षम झाल्या पाहिजे. त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची मोठ्या प्रमाणात विक्री करण्यासाठी ग्राहकांमध्ये उत्पादित केलेल्या वस्तूंबाबत त्या भेसळ नसलेल्या व रासायनिक प्रक्रिया केलेल्या नाहीत याबाबत विश्वास निर्माण केला पाहिजे.असे प्रतिपादन आमदार ऍड. किरणराव सरनाईक यांनी केले.

        आज 8 नोव्हेंबर रोजी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाच्या वतीने दिवाळीच्या निमित्ताने वाशिमच्या विठ्ठलवाडी मंगल कार्यालय येथे आयोजित तीन दिवशीय बचत गटांच्या उत्पादित वस्तूंचे जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे उद्घाटन करताना आमदार ऍड. सरनाईक बोलत होते.   

           यावेळी माविमचे विभागीय सनियंत्रण अधिकारी केशव पवार, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे,प्रा.के.बी देशमुख,माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

                 ऍड. सरनाईक पुढे म्हणाले,बचत गटाच्या माध्यमातून महिला ह्या आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजे हा शासनाचा उद्देश आहे.तसेच त्या कुटुंबाचा आर्थिक आधार झाल्या पाहिजे.महिलांच्या उन्नतीसाठी राज्य व केंद्र सरकार विविध योजना राबवित आहे. भविष्यात देशांमध्ये महिलांचे राज्य तयार होणार आहे.कारण केंद्राने महिलांना 33 टक्के आरक्षण दिले आहे.आजच्या या प्रदर्शनामुळे दिवाळीमध्ये लागणाऱ्या विविध वस्तू व फराळाचे साहित्य उपलब्ध झाले आहे.जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन विविध वस्तूंची व पदार्थाची खरेदी केली पाहिजे असे ते म्हणाले.

      यावेळी पवार व खडसे  यांचीही समायोजित भाषणे झाली. 

        आमदार अमित झनक यांनीही प्रदर्शन व विक्रीला भेट दिली.यावेळी नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक शंकर कोकडवार, शिंदे,माविमचे विभागीय सनियंत्रण अधिकारी केशव पवार,दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या स्पार्क प्रकल्पाच्या तांत्रिक सल्लागार श्रीमती रचना सिंग,स्पार्क प्रकल्पाचे युगांडा येथील अंध प्रशिक्षक इरिक बावा यांची प्रमुख उपस्थिती होती.   

           आमदार झनक म्हणाले, बचत गटांच्या उत्पादित मालाला घरची चव असते.त्याची तुलना इतरांशी होऊ शकत नाही.बचत गटातील महिलांनी स्वतःच्या कर्तुत्वावर साहित्याचा एक ब्रँड तयार केला पाहिजे केला आहे.बचत गटाच्या उत्पादित मालाची विक्री विभागीय व राज्य पातळीवरील आयोजित प्रदर्शनातून झाली तर बचत गटातील महिलांना प्रेरणा मिळण्यास मदत होईल असे ते म्हणाले.

       यावेळी श्रीमती रचना सिंग व श्री इरिक यांचीही भाषणे झाली.    

             मान्यवरांनी बचत गटांच्या उत्पादित वस्तूंच्या विविध स्टॉलला भेट देऊन महिलांशी विक्रीसाठी असलेल्या वस्तू,साहित्य व पदार्थाविषयी संवाद साधला.

                  प्रारंभी आमदार ऍड.श्री. सरनाईक यांनी फित कापून प्रदर्शन व विक्रीचे उद्घाटन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागीय सहनियंत्रण अधिकारी केशव पवार यांनी केले. संचालन जिल्हा सनियंत्रण अधिकारी कल्पना लोहकपुरे यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रांजली वसाके यांनी मानले. 

         माविमच्या या दिवाळीनिमित्ताने आयोजित प्रदर्शन व विक्रीमध्ये  जिल्ह्यातील 40 बचत गटांचे विविध वस्तू,साहित्य व खाद्य पदार्थाचे स्टॉल लावण्यात आले आहे.माविमच्या जिल्ह्यातील  60 बचत गटांच्या महिला यामध्ये सहभागी झाल्या आहेत.

               कार्यक्रमाला जिल्ह्यातील माविमच्या सर्व लोकसंचालित साधन केंद्राचे व्यवस्थापक,लेखापाल, उपजीविका सल्लागार,सहयोगिनी, माविमच्या जिल्हा कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच बचत गटातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

0 Response to "बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचा ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण करावा माविच्या उत्पादित वस्तू व प्रदर्शनाचे उद्घाटन"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article