-->

डाक आठवडा व पोषण मोहिमेनिमित्त  कार्यक्रम संपन्न

डाक आठवडा व पोषण मोहिमेनिमित्त कार्यक्रम संपन्न

 


साप्ताहिक सागर आदित्य 

डाक आठवडा व पोषण मोहिमेनिमित्त

कार्यक्रम संपन्न

        वाशिम,  : भारतीय डाक विभागाचा डाक आठवडा आणि जिल्हा परिषदेच्या वतीने साजरा करण्यात येणारा पोषण महिन्यानिमित्त जिल्हा परिषद शाळा, काटा येथे २० सप्टेंबर रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने सुकन्या समृद्धी योजनेची माहिती देऊन बाल आधार शिबीर घेण्यात आले.

           कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्या श्रीमती संध्या देशमुख, पंचायत समितीचे माजी सभापती वीरेंद्र देशमुख, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे, बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती गवळी तसेच सरपंच, शिक्षण समिती सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती.

          श्रीमती पंत यांनी उपस्थित ग्रामस्थांना सुकन्या समृद्धी योजनेचे खाते काढण्यासाठी व माता भगिनींना आपल्या बाळाचे आधार काढण्याचे आवाहन केले. तसेच पोषण महिन्यानिमित्त उपस्थित महिला भगिनींना आरोग्याविषयी माहिती दिली.

          इंडिया पोस्ट्स पेमेंटस बँकेचे व्यवस्थापक पंकज देशमुख यांनी भारतीय डाक विभागाच्या सर्व योजनांची माहिती दिली.  जोल्हे यांनी सुकन्या समृद्धी योजनेचे आणि बाल आधारचे महत्व पटवून दिले. बालकाचे अन्न प्राशन व गरोदर माता गोदभराई कार्यक्रम श्रीमती देशमुख यांच्या हस्ते पार पडला. या शिबिरामध्ये 79 बालकांचे बाल आधारकार्ड काढण्यात आले. तसेच 46 मुलींचे सुकन्या समृद्धी खाते उघडण्यात आले. या कार्यक्रमाला ग्रामस्थांनी चांगल्या प्रकारे सहकार्य करून उर्त्स्फूत प्रतिसाद दिला. काटा पोस्ट मास्तर भावना घाटोले व पोस्टमन  भुजबळ यांनी चांगल्या प्रकारे कार्यक्रमाचे नियोजन केले. प्रास्ताविक गजानन काळे यांनी करून सुकन्या समृद्धी योजनेची आणि बाल आधार शिबीराबाबतची माहिती दिली. संचालन निकिता महल्ले यांनी केले. आभार पोस्टमास्तर  सरनाईक यांनी मानले.



Related Posts

0 Response to "डाक आठवडा व पोषण मोहिमेनिमित्त कार्यक्रम संपन्न"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article