ऑटो रिक्षाचालकाचा मुलगा बनला पोलीस उप निरीक्षक (PSI)...... ठाम निश्चय, जिद्द, चिकाटीच्या जोरावर यशाला घातली गवसणी...
साप्ताहिक सागर आदित्य
ऑटो रिक्षाचालकाचा मुलगा बनला पोलीस उप निरीक्षक (PSI)......
ठाम निश्चय, जिद्द, चिकाटीच्या जोरावर यशाला घातली गवसणी...
केकतउमरा ता.जि.वाशीम गावातील पहिला पोलीस उप निरीक्षक होण्याचा मिळविला मान...
मनाचा ठाम निश्चय,दुर्दम्य इच्छाशक्ती ,जिद्द आणि चिकाटी ठेवली तर कुठलीही गोष्ट शक्य होऊ शकते.हलाखीच्या आर्थिक परिस्थितीवर सुद्धा मात करता येते.वाशीम येथील १२ किलोमिटर अंतरावर असलेल्या केकतउमरा येथील सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या योगेश गजानन तडस या तरुणाने हे सिद्ध करून दाखवून दिले. एका रिक्षाचालकाचा मुलगा ते पोलीस उप निरीक्षक (PSI )अशी मजल मारून कुटुंबीयांचेच नव्हे तर सर्व समाजाचे, केकतउमरा वासियांचे नावदेखील उंचावले.लहानपणापासून आपल्या वडीलाला ऑटो रिक्षा चालवताना पाहत तो मोठा झाला. शासकीय अधिकारी व्हायचे असे ध्येय मनाशी बाळगून *योगेश* ने त्याच्या आयुष्याची सुरवात केली. लहान पणापासून त्याला पोलीस वर्दीचे आकर्षण होते. प्राथमिक शिक्षण गावातीलच जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत पूर्ण झाले.बारावीपर्यंतचे शिक्षण त्याने ग्रामीण भागातील विठाबाई पसारकर विद्यालय , केकतउमरा येथे पूर्ण केले.B A पदवीचे शिक्षण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक मधून पूर्ण केले.
त्यांनतर त्यांनी आपला मोर्चा स्पर्धा परीक्षेकडे वळविला.पहिल्यांदाच त्याने आर्मी ची शारीरिक क्षमता चाचणी पार केली परंतु लेखी परीक्षेत यश मिळाले नाही.या काळात त्याचे मानसिक खच्चीकरण झाले.परंतु हिम्मत सोडली नाही...
म्हणतात ना.. मंजिले उन्हीको मिलती है जिन के सपनो मे जान होती है..खाली पंख होने से कुछ नही होता ..हौसलोंसे उडाण होती है |
त्याने पुन्हा त्याच उमेदीने प्रयत्न सुरू केले.२०२० मध्ये त्याने गावातीलच मित्र चंद्रकांत वाठ याच्या मार्गदर्शनाने एमपीएससी चा अभ्यास सुरू केला.२०२१ मध्ये तो STI, मंत्रालय लिपिक पूर्व परीक्षा पास झाला.परंतु मुख्य परीक्षेत पुन्हा एकदा यशाने हुलकावणी दिली.२०२२ ला सुद्धा मुख्य परीक्षेत अपयशी ठरला.या अपयशाने तो खचला नाही....या काळात त्याचे वडील गजानन तडस हे केकत उमरा ते वाशीम या रोडवर ऑटो चालविण्याचे काम करत आहेत.सुरवातीला तर भड्याने ऑटो घेऊन चालवीत होते.आई शेतात रोज मजुरी करत होती.बहिणीचे शिक्षण सुरू होते.पण त्यांनी मुलाचे मनोधैर्य खचू दिले नाही...त्याला प्रोत्साहित केले.पैशाची कमी पडू दिली नाही.२०२२ मध्ये झालेल्या पूर्व व मुख्य परीक्षेत अखेर यश मिळाले.पण या काळात योगेशला आजारी पणामुळे दवाखान्यात भरती व्हावे लागले.अशातच त्याने शारीरिक क्षमता व मुलाखतीची तयारी केली.दोन्ही दिव्याग्नी तून तावून सलाखून बाहेर पडला... अन् १० जानेवारीला जाहीर झालेल्या अंतिम यादीत झळकले. विशेष म्हणजे MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या पोलीस उप निरीक्षक पदासाठी दिलेल्या पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले.योगेशाच्या आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याने पुणे,मुंबई,औरंगाबाद अशा मोठ्या शहरात क्लासेस न लावता वाशीम येथे विक्रीकर सहा.आयुक्त विलास सारस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली चालत असलेल्या महात्मा गांधी स्टडी सर्कल येथे तयारी केली. आतापर्यंत MPSC मार्फत ७ पैकी ६ लिपिक ,विक्रीकर निरीक्षक,कर सहाय्यक यांच्या मुख्य परीक्षा दिल्या.या प्रेरणादायी प्रवासात त्याला चंद्रकांत वाठ,पोलीस उप निरीक्षक विजय मोरे, पोलीस उप निरीक्षक अमोल मार्कड,पोलीस उप निरीक्षक गणेश इंगळे,विक्रीकर निरीक्षक भागवत सारस्कर यांचे मार्गदर्शन लाभले.मित्र जयराम वाशीमकर,श्रीधर नवघरे,अनिकेत ढगे यांनी मोलाची साथ मिळाली.
आई- वडील, बहीण यांचा माझ्या यशामध्ये मोठा वाटा राहिला असल्याची प्रतिक्रिया त्याने दिली.
यापुढे लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन पोलीस विभागाच्या यापेक्षाही मोठ्या वरिष्ठ अधिकारीपदी नियुक्त होण्याचा प्रयत्न करीत राहील.ग्रामीण भागातील सर्व स्तरातील मलामुलींनी स्पर्धा परीक्षेची भीती आणि न्यूनगंड न बाळगता अभ्यास करून स्पर्धेत उतरावे, उच्च शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहावे,आपली इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी असेल तर जगात अशक्य काहीच नाही अशा शब्दात योगेश तडस ने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आवाहन केले.
शब्द व संकलन...
संभाजी साळसुंदर (शिक्षक), केकतउमरा
0 Response to "ऑटो रिक्षाचालकाचा मुलगा बनला पोलीस उप निरीक्षक (PSI)...... ठाम निश्चय, जिद्द, चिकाटीच्या जोरावर यशाला घातली गवसणी..."
Post a Comment