
जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा, पांगरी नवघरे येथे प्रजासत्ताक दिन व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न
साप्ताहिक सागर आदित्य
जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा, पांगरी नवघरे येथे प्रजासत्ताक दिन व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न
वाशीम जिल्ह्यातील मालेगांव तालुक्यातील पांगरी नवघरे येथे येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक डिजिटल शाळा पांगरी नवघरे येथे वार्षिक स्नेहसंमेलन अध्यक्ष सुनील भाऊ नवघरे सौ सोनाली प्रमोद नवघरे प्रमुख अतिथी सर्व व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्याकरता उद्धवराव जोगदंड उच्च श्रेणी मुख्याध्यापक सुभाष घुगे सर पदवीधर शिक्षक ,श्रीमती देशपांडे मॅडम पदवीधर शिक्षिका, वाघे सर, बोपटे सर, जाधव सर व निलेश नवघरे सर यांनी परिश्रम घेतले
नंतर लगेचच विद्यार्थ्यांचा बहारदार
सांस्कृतिक कार्यक्रम सुरू झाला.यामध्ये देशभक्तीपर गीते,लावणी,लोकगीते,सिनेमा गीते यांच्यावर बहारदार नृत्य सादर केले.तसेच गीतगायन,भाषणे सुद्धा झाली.
सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आपल्या मुलांचा उत्साह वाढविण्यासाठी सर्व पालक ,गावकरी मंडळी, महिला भगिनी कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते
0 Response to "जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा, पांगरी नवघरे येथे प्रजासत्ताक दिन व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न"
Post a Comment