राजमाता जिजाऊ माँ साहेब यांना अभिवादन
साप्ताहिक सागर आदित्य
राजमाता जिजाऊ माँ साहेब यांना अभिवादन
वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे 12 जानेवारी ला राजमाता जिजाऊ साहेब यांच्या जयंतीनिमित्त
अभिवादन रॅलीचे आयोजन केले असता शाळेचे मुख्याध्यापक प्रसेन भगत यांनी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले व रॅली स प्रारंभ करण्यात आला राजमाता जिजाऊ साहेब यांच्या वेशभुषा परिधान करून चंचल चव्हाण, संचिता राठोड ,लेझीम पथका मध्ये वैष्णवी मोहोळ, प्रणिती जाधव, मीनाक्षी धट, शिवानी राठोड, किंजल राठोड, वैष्णवी वारे, संचिता राठोड, ज्ञानदीपाली, मोहीनी पांडे, प्रित बावरी, अश्विनी अंभोरे इत्यादी मुले सहभागी झाले होते तर जिजाऊ वंदन गीत, चंचल चव्हाण, चंचल नेमिचंद, साक्षी लोखंडे, यांनी गायले, रॅली यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक कर्मचारी यांनी योगदान दिले
0 Response to "राजमाता जिजाऊ माँ साहेब यांना अभिवादन"
Post a Comment