-->

शेतकऱ्यांप्रती सहवेदना व्यक्त करण्यासाठी भूमिपुत्र चे अन्नत्याग आंदोलन

शेतकऱ्यांप्रती सहवेदना व्यक्त करण्यासाठी भूमिपुत्र चे अन्नत्याग आंदोलन


साप्ताहिक सागर आदित्य/

शेतकऱ्यांप्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी भूमिपुत्र चे अन्नत्याग आंदोलन

वाशिम : 
शेतकऱ्यांप्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटने कडून संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन आयोजित करण्यात आले होते. जेष्ठ साहित्यिक बाबाराव मुसळे यांच्या हस्ते लिंबूपाणी घेऊन आंदोलनाची सांगता करण्यात आली.
यावेळी भूमिपुत्रचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर अवचार, युवक जिल्हाध्यक्ष सचिन काकडे, जिल्हा प्रवक्ता देव इंगोले, वाशिम तालुकाध्यक्ष संतोष सुर्वे, मनोरा तालुकाध्यक्ष भूषण मुराळे, विधी सेल जिल्हाध्यक्ष अँड. मोरे , शिवाजीराव वाटाणे, महावीर ठाकूर, सीतारामजी लोखंडे, गजानन काकडे,  विश्वेश्वर बावणे, राम अवचार, बंडू जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
अन्नदाता शेतकरी मागील काही वर्षांपासून आसमानी व सुलतानी संकटात सापडला आहे. नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. अश्या स्थितीत अन्नदात्याला धिर देण्याची खरी गरज आहे. म्हणून शेतकऱ्यांच्या संकटात 'अन्नखाते' म्हणून आम्ही तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहोत तुम्ही धिर सोडू नका या भावना व्यक्त करण्यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने हे अन्नत्याग आंदोलन करण्यात आले होते.
 
 १९ मार्च१९८६ रोजी यवतमाळ जिल्ह्य़ातील चिलगव्हाण येथिल शेतकरी साहेबराव करपे व मालती करपे यांनी व्यवस्थेला कंटाळून आपली दोन चिमुकल्यांसह आत्महत्या केली होती. ती जाहीर झालेली पहिली आत्महत्या होती. तेव्हापासून सुरू असलेले आत्महत्येचे सत्र  कोणत्याही सरकारला अजूनही थांबवता आले नाही.

करपे कुटुंबियांच्या स्मृती दिनी 'सहवेदना दिवस' पाळून  अन्नत्याग करत आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांना सहवेदना दिली जाते. मागील अनेक वर्षांपासून किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब व भूमिपुत्रचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी हे अन्नत्याग आंदोलन करण्यात येते.

0 Response to "शेतकऱ्यांप्रती सहवेदना व्यक्त करण्यासाठी भूमिपुत्र चे अन्नत्याग आंदोलन "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article