विभागीय आयुक्त पियुष सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेत नोट रिडिंग
साप्ताहिक सागर आदित्य/
विभागीय आयुक्त पियुष सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेत नोट रिडिंग
जल जीवन मिशन व महाआवास योजनेचा घेतला आढावा
वाशिम दि.19 - विभागीय आयुक्त पियुष सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या विविध विभागाच्या ठळक मुद्द्यांचे वाचन 17 मार्च रोजी महात्मा फुले सभागृहात करण्यात आले.तसेच यावेळी सिंह यांनी जल जीवन मिशन व महाआवास योजनेच्या कामांचा आढावा घेतला.यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत,उप आयुक्त (आस्थापना) शरद कुलकर्णी, प्रभारी सहाय्यक आयुक्त (तपासणी) सुधाकर दवंडे,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल निकम, मुख्य लेखा व वित्त अधिकारी तूषार मोरे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.) विवेक बोंद्रे,पंचायत विभागाचे प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.विनोद वानखडे, महिला व बालकल्याण विभाग तसेच सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
विभागीय आयुक्तांच्या निरिक्षण पथकामार्फत दरवर्षी जिल्हा परिषदेच्या कामकाजाची तपासणी करण्यात येते.मागील वर्षी म्हणजे 1 ते 18 जानेवारी 2021 दरम्यान वाशिम जि.प.मधील खाते प्रमुखांच्या कामकाजाचे निरिक्षण करण्यात आले होते. या निरिक्षणातील ठळक मुद्द्यांचे वाचन (नोट रिडिंग) विभागीय आयुक्त पियुष सिंह यांच्या समक्ष करण्यात आले.त्यानुसार विभागप्रमुखांना आयुक्त सिंह यांनी आवश्यक त्या सुचना दिल्या.आकांक्षित जिल्हा म्हणुन वाशिम जिल्ह्यात विविध योजना प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश विभागीय आयुक्त सिंह यांनी दिले. यावेळी जलजीवन मिशन व महाआवास योजनांच्या कामांचा आढावा घेण्यात आला.संबंधित विभागाचे विभाग प्रमुख आणि सर्व गट विकास अधिकारी यावेळी उपस्थित होते.
0 Response to "विभागीय आयुक्त पियुष सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेत नोट रिडिंग"
Post a Comment