शहीद जाट भगतसिंह शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदगाव जिल्हा नाशिक येथे राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आला
साप्ताहिक सागर आदित्य
शहीद जाट भगतसिंह शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदगाव जिल्हा नाशिक येथे राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आला
12 जानेवारी या दिवशी स्वामी विवेकानंद यांची जयंती असते व हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून जगभरात साजरा करण्यात येतो.12 जानेवारी पासून पुढील आठवडा हा राष्ट्रीय युवा आठवडा म्हणून साजरा करण्याबाबत संचालनालयाने कळविले होते. संस्थेतील प्रशिक्षणार्थ्यांच्या विविध गुणांना तसेच कौशल्यांना वाव मिळावा व प्रोत्साहन मिळावे यासाठी संस्थेमध्ये वादविवाद स्पर्धा, वकृत्व स्पर्धा,निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा तसेच पारंपारिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले संस्थेतून उत्तीर्ण झालेले व यशस्वी उद्योजक म्हणून नावारूपास आलेल्या माजी प्रशिक्षणार्थींचा देखील यथोचित गौरव करण्यात आला. तंत्र प्रदर्शनातील व विविध खेळातील तसेच उपक्रमातील विजेत्या प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रमुख वक्ते व्ही.जे. हायस्कूल नांदगाव येथील शिक्षक कुणाल जोशी सर यांनी भूषविले. स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांचा जीवन परिचय त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून उलगडला. संस्थेत प्रशिक्षण घेऊन यशस्वी उद्योजक म्हणून नावलौकिक मिळविलेल्या वेल्डर व्यवसायाचा प्रशिक्षणार्थी शशिकांत ठोंबरे व इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक व्यवसायाचा शिवम भिंगारकर यांनी स्वानुभवातून यशस्वीतेचा खडतर प्रवास कसा साध्य केला याचा उहापोह केला.
संस्थेच्या प्राचार्या सौ.ए.एस. कुलकर्णी यांनी सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन पी. एस. गायकवाड यांनी केले. याप्रसंगी सर्व निदेशक व कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहभाग घेतला.
2047 मध्ये भारत देश कसा असेल या विषयावर इंडो जर्मन टूल रूम यांचे वतीने राजेश चंचलाणी (प्रेरक वक्ता) यांनी प्रशिक्षणार्थींना अतिशय महत्त्वाचे मार्गदर्शन केले. जागतिक स्पर्धा व भारतापुढील आव्हाने व संधी याविषयी मार्गदर्शन केले 2047 मध्ये भारत एक विकसित अर्थव्यवस्था म्हणून आत्मनिर्भर भारत असेल असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला. आभार प्रदर्शनाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
0 Response to "शहीद जाट भगतसिंह शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदगाव जिल्हा नाशिक येथे राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आला"
Post a Comment