-->

जगन्नाथ शिंदे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त देशातील औषध विक्रेत्यांचा रक्तदान शपथेचा विश्वविक्रम अनिल नावंदर

जगन्नाथ शिंदे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त देशातील औषध विक्रेत्यांचा रक्तदान शपथेचा विश्वविक्रम अनिल नावंदर

 


साप्ताहिक सागर आदित्य 

जगन्नाथ शिंदे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त देशातील औषध विक्रेत्यांचा रक्तदान शपथेचा विश्वविक्रम अनिल नावंदर


अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटना व महाराष्ट्र राज्य केमिस्टस् अॅन्ड ड्रगिस्टस् असोसिएशन चे अध्यक्ष जगन्नाथजी शिंदे यांचा ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवस व अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेचा गोल्डन ज्युचिली वर्ष या निमित्त देशातील औषध विक्रेत्यांनी दि. २४ जानेवारी २०२५ रोजी संपूर्ण देशात रक्तदान व रक्तदानासाठी शपथ असा कार्यक्रम आखला होता. संपूर्ण देशभरातून यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकंदरीत ८०३०६ औषध विक्रेत्यांनी स्क्तदान करण्याबाबत शपथ घेऊन विश्वविक्रम स्थापित केला व संघटनेचे नांव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् मध्ये समाविष्ट केले.


संपूर्ण देशातून ८०३०६ पैकी जवळपास ७० हजाराहून जास्त रक्तदात्यांनी त्याच दिवशी स्क्तदानही केले. संघटना व संघटनेच्या नेतृत्वाबद्दल असलेली आस्था याचा हा विश्वविक्रमच म्हणावा लागेल. एकसंघ व शिस्तबद्ध संघटना म्हणून अखिल भारतीय केमिस्टस् संघटना व महाराष्ट्र राज्य केमिस्टस् अॅन्ड ड्रगिस्टस् असोसिएशन ओळखली जाते.


केमिस्ट सम्राट  जगन्नाथ आप्पासाहेब शिंदे हे मागील जवळपास ४० वर्षापासून केमिस्टस् संघटनेमध्ये काम करत असुन औषध वितरण व आरोग्य सेवेशी संबंधी त्यांचे कार्य यामुळेच त्यांचेवरील अखिल भारतातील केमिस्ट व फार्मासिस्ट चांधवांचे प्रेम आज सिध्द झाले आहे.


संघटनेने संकल्प घेतलेल्या या प्रकल्पास देशातील व प्रमुखता महाराष्ट्र राज्यातील औषध विक्रेते, फार्मासिस्टस्, मेडीकल रिप्रेझेंटेटिव्हज, फार्मसी कॉलेजेस, औषधी दुकानातील कर्मचारी वर्ग यासह अनेक जणांच्या सहभागामुळेच हा उपक्रम यशस्वी होऊ शकला त्याबद्दल आम्ही सर्व रक्तदाते व रक्तदानाची शपथ घेणा-या प्रत्येकाचे सहृदय आभार व्यक्त करतो. महाराष्ट्र राज्य केमिस्टस् अॅन्ड ड्रगिस्टस् संघटनेचे सर्व जिल्हा, तालुका पातळीवरील सर्व पदाधिका-यांनी केलेले नियोजनबद्ध काम यामुळेच हे होऊ शकले व याचे मुख्य श्रेयही त्यांनाच जाते. संघटनेच्या या उपक्रमामुळे देशाला व राज्याला हजारो नविन रक्तदाते मिळाले असून यापुढे रक्ताच्या कमतरतेमुळे होणारे मृत्यू रोखण्यास आम्हाला मोठी मदत होणार आहे. संघशक्ती आणि मानवसेवा याचे हे उत्कृष्ट उदाहरण म्हणून भविष्यात याकडे निश्चितच पाहिले जाईल.


कल्याण येथील पोटे मैदानात जगन्नाथ शिंदे यांचा ७५ वा वाढदिवस उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. याप्रसंगी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड चे मिलिंद वेलणेकर व  स्वप्नील डंगारीकर यांनी स्वतः उपस्थित राहून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड चे सर्टिफिकेट जगन्नाथ शिंदे यांना सुपूर्द केले. याप्रसंगी संपूर्ण देशातून आलेले संघटनेचे पदाधिकारी, केमिस्ट बांधव व हजारो नागरीक या नयनरम्य सोहळ्याचे साक्षीदार म्हणून उपस्थित होते.

वाशिम जिल्हाचा शुध्दा खारीचा वाटा असुन सर्व रक्तदात्याचे अभिनंदन व सर्वांच्या प्रती अभार व्यक्त करत वाशिम जिल्हा अध्यक्ष राजेश पाटील सिरसाट व सचिव नंदकीशोर झंवर यांनी पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या.





Related Posts

0 Response to "जगन्नाथ शिंदे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त देशातील औषध विक्रेत्यांचा रक्तदान शपथेचा विश्वविक्रम अनिल नावंदर"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article