
स्वरगंधार शंकर महादेवन यांचे मंगरूळपीरच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन संगीत धडे !
साप्ताहिक सागर आदित्य
स्वरगंधार शंकर महादेवन यांचे मंगरूळपीरच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन संगीत धडे !
वाशिम , प्रख्यात गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हाधिकारी वाशिम आणि जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने पी.एम. श्री जि. प. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मंगरूळपीर येथे ऑनलाइन संगीत व गायन वर्ग सुरू करण्यात आले आहेत. हा उपक्रम २५ सप्टेंबर २०२४ पासून दर गुरुवारी राबविला जात आहे.
१ फेब्रुवारी रोजी झालेल्या वर्गामध्ये सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन गीत गायनाचे धडे दिले. या सत्राचे संचालन गायक तन्मय भावलकर यांनी केले. विशेष म्हणजे, तीन राज्यांमधील निवडक शाळांतील विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते.
कार्यक्रमाला जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस, आभासी पध्दतीने उपस्थित होत्या.उपशिक्षणाधिकारी गजानन डाबेराव, मुख्याध्यापक एस. पी. टिक्कस, पर्यवेक्षक विनोद बाबरे, तसेच कलाशिक्षक आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी संगीत विद्यार्थी, शिक्षक आणि शाळेच्या प्रशासनाने विशेष परिश्रम घेतले.
हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी ठरत असून, ग्रामीण भागातील संगीतप्रेमींसाठी राष्ट्रीय पातळीवरील दिग्गज कलाकारांकडून थेट शिक्षण मिळवण्याचा अनमोल अनुभव ठरतो आहे.
0 Response to "स्वरगंधार शंकर महादेवन यांचे मंगरूळपीरच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन संगीत धडे !"
Post a Comment