शालेय तंबाखू नियंत्रण, किशोर स्वास्थ्य आणि बेटी बचाव अभियानाचा जागर
साप्ताहिक सागर आदित्य
शालेय तंबाखू नियंत्रण, किशोर स्वास्थ्य आणि बेटी बचाव अभियानाचा जागर
वाशिम, जिल्हा रुग्णालय वाशिम अंतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग ठोंबरे, अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अविनाश पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली स्व. गंगारामजी काळे माध्यमिक विद्यालय, दाभा ता. मंगरूळपीर येथे तंबाखू नियंत्रण, किशोर स्वास्थ्य व बेटी बचाव अभियान विषयक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांना तंबाखूजन्य पदार्थांचे दुष्परिणाम, मुख कर्करोग व त्याची लक्षणे तसेच तंबाखू नियंत्रण कायदा (कोटपा २००३) यावर सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण धाडवे यांनी मार्गदर्शन केले. महिला सक्षमीकरण, लिंग परीक्षण प्रतिबंध कायद याबाबत ऍड. राधा नरवलिया मॅडम यांनी माहिती दिली. किशोरवयीन आरोग्याबाबत अर्श समन्वयक दीपक भालेराव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
शाळेचे मुख्याध्यापक ए. बी. गावंडे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम यशस्वी झाला. तंबाखू मुक्ती व बेटी बचाव शपथ घेण्यात आली. या कार्यक्रमासाठी शिक्षक व विद्यार्थ्यांचनी पुढाकार घेतला.
0 Response to "शालेय तंबाखू नियंत्रण, किशोर स्वास्थ्य आणि बेटी बचाव अभियानाचा जागर"
Post a Comment