
आला हिवाळा , त्वचा सांभाळा : त्वचेच्या तक्रारी वाढल्या हिवाळ्यात
साप्ताहिक सागर आदित्य/
आला हिवाळा , त्वचा सांभाळा : त्वचेच्या तक्रारी वाढल्या हिवाळ्यात त्वचा कोरडी पडतेय ; डॉक्टर साहेब उपाय काय करू ?
वाशिम : हिवाळा ऋतू हा आरोग्यदायी मानला जात असला तरी कडाक्याच्या थंडीमुळे त्वचेशी संबंधित तक्रारीही वाढत आहेत . थंडी जाणवत असल्याने त्वचेचा कोरडेपणा , त्वचा निस्तेज होणे , ओठ फुटणे अशा तक्रारी घेऊन अनेकजण त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेत असल्याचे पाहावयास मिळत आहे . जिल्ह्यात थंडीचा जोर वाढत आहे . त्यामुळे गुलाबी थंडीत त्वचेची काळजी कशी घ्यावी ? अशी चिंता सर्वांनाच सतावते . प्रत्येकाला आपली त्वचा मुलायम आणि सुंदर असावी असे वाढणं स्वाभाविक आहे . त्यासाठी अनेकजण " ब्यूटी प्रोडक्ट्स चाही वापर करतात . डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही क्रिम कितीही प्रमाणात वापरली किंवा परस्पर कोणताही औषधोपचार घेतला तर त्याचे साईड इफेक्टही होऊ शकतात . उन्हाळ्यात आपली त्वचा नियमितपणे घामाला शरीराबाहेर फेकण्याचे काम करीत असल्याने त्वचा कोरडी पडत नाही . परंतु अशी घ्यावी त्वचेची काळजी त्वचा तेलकट असेल तर जेल पद्धतीचे आणि कोरडी त्वचा असेल तर क्रीम पद्धतीचे मॉइश्चरायझर ( लोशन ) वापरावे .
● अधिकाधिक पाणी प्यावे . पाण्यामुळे चेहऱ्यावरील मुलायमपणा टिकून राहतो .
• आहारात अॅन्टीऑक्सिडेंट , फायबर आणि अन्य पोषक घटक असणाया पदार्थाचा समावेश असावा .
● थंड पाण्याऐवजी कोमट पाण्याने चेहरा धुवावा .
• ऊबदार कपड्यांचा वापर करावा . " हिवाळा सुरू झाल्याने त्वचा कोरडी पडणे , ओठ फुटणे , त्वचेवर सुरकुत्या येणे अशा समस्या घेऊन अनेकजण उपचारासाठी येत आहेत . त्वचा कोरडी , निस्तेज झाली असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढीलउपचार घ्यावे . हिवाळा हा आरोग्यदायी असला तरी कडाक्याच्या थंडीत योग्य ती काळजी घेतली नाही तर त्वचेबरोबरच चेहरा काळवडणे , पायाच्या टार्चला भेगा पडणे यासह त्वचेच्या अन्य समस्या उद्भवतात . त्वचेचे आरोग्य जपायला हवे .
-डॉ . मोहन गोरे, त्वचारोग तज्ज्ञ वाशिम
0 Response to "आला हिवाळा , त्वचा सांभाळा : त्वचेच्या तक्रारी वाढल्या हिवाळ्यात "
Post a Comment