-->

भारत जोडो पदयात्रा  १५ ते १७ नोव्हेंबर दरम्यान वाहतूक मार्गात बदल

भारत जोडो पदयात्रा १५ ते १७ नोव्हेंबर दरम्यान वाहतूक मार्गात बदल



साप्ताहिक सागर आदित्य 

भारत जोडो पदयात्रा

१५ ते १७ नोव्हेंबर दरम्यान वाहतूक मार्गात बदल

वाशिम  खासदार  राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो पदयात्रा १५ व १६ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात हिंगोली जिल्ह्यातून प्रवेश करीत असुन पुढे अकोला जिल्ह्यात मार्गक्रमण करणार आहे.

        या पदयात्रेदरम्यान मोठया संख्येने लोक सहभागी होणार असून वाहनांची संख्या देखील मोठी राहणार आहे.व्हिआयपी सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातुन यात्रेच्या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतुक बंद ठेवणे गरजेचे आहे.परंतु नागरिकांची गैरसोय होणार नाही याकरीता पर्यायी वळण रस्ते देण्यात आले आहे.१५ ते १६ नोव्हेंबर पर्यंत पदयात्रा वाशिम जिल्हयात कन्हेरगांव नाका ते मेडशीपर्यंत एकूण ५५ किमी प्रवास करणार आहे. त्यादरम्यान पुढील मार्गावरील वाहतुक बंद करुन त्यांना पर्यायी मार्गाने वाहतुक वळविण्याचे निर्देश दिले आहे.

             मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३३ (१) (ख) नूसार जिल्हादंडाधिकारी षन्मुगराजन एस. यांनी १५ ते १७ नोव्हेंबरपर्यंत मुळ मार्गावरील वाहतुक प्रस्तावित मार्गावर वाहतुक वळविणेबाबतचे आदेश निर्गमित केले आहे. वाहतुकीकरीता बंद करणे आवश्यक असलेले मार्ग वाशिमकडून हिंगोलीकडे जाणारी सर्व वाहतुक १४ नोव्हेंबर रोजीचे रात्री २ वाजतापासून बंद राहील.  

           पर्यायी  मार्ग वाशिमवरून हिंगोलीकडे जाण्याकरीता रिसोड,सेनगाव,नर्सरी टी पॉइंट मार्ग हिंगोली.१५ नोव्हेंबर रोजी वाशिमकडून हिंगोलीकडे जाणारी सर्व वाहतुक बंद.पर्यायी मार्ग वाशिमवरून हिंगोलीकडे जाण्याकरीता रिसोड,सेनगाव,नर्सरी टी पॉइंट मार्ग हिंगोली. हिंगोलीकडुन वाशिमकडे येणारी सर्व वाहतुक बंद,पर्यायी मार्ग अकोला, बाळापूर व पातूरकडून हिंगोलीकडे जाणारी वाहतुक मालेगाव,शिरपूर, रिसोड, सेनगाव नर्सी टी पॉइंट मार्ग हिंगोली. मालेगांवकडुन वाशिमकडे येणारी सर्व वाहतुक बंद,पर्यायी मार्ग मालेगाववरुन वाशिम जाण्याकरीता शेलूबाजार, मंगरूळपीरमार्ग वाशिम. मेहकरकडुन मालेगांवमार्ग वाशिमकडे येणारी सर्व वाहतुक बंद, पर्यायी मार्ग मेहकरकडुन वाशिम जाणेकरीता मालेगांव,शिरपुर, रिसोड मार्ग वाशिम. मालेगांववरुन पुसद जाणेकरीता शेलुबाजार,मंगरुळपीर, मानोरा, दिग्रसमार्गे पुसद. अमरावतीकडुन हिंगोली जाणेकरीता कारंजा, मालेगांव, शिरपुर, रिसोड, सेनगांव, नर्सी टी पॉईंट मार्ग हिंगोली.

      १५ नोव्हेंबर रोजी वाशिम शहरांतर्गत मुख्य रस्ता हिंगोली नाका,पुसद नाका,पोस्ट ऑफीस चौक, पोलीस स्टेशन वाशिम शहर चौक, अकोला नाका, मालेगाव रोडवरील पाटील ढाबा पर्यंत येणारी व जाणारी सर्व वाहतुक बंद , पर्यायी मार्ग मुख्य मार्ग बंद राहिल्याने वाशिम शहरांतर्गत पूर्व वाशिम भाग व पश्चिम

वाशिम भाग यांना जोडण्याकरीता सिव्हिल लाइन्स,काटारोड मार्गे पाटील धाबा, मथुरा हॉटेल, झाकलवाडी, रिसोड रोड असा पर्यायी मार्ग (हलक्या वाहनांकरीता) दोन्ही बाजुने ये-जा करण्याकरीता वापरण्यात यावा.

       १६ नोव्हेंबर रोजी वाशिमकडुन मालेगांव व पातुरकडे जाणारी सर्व वाहतूक बंद, पर्यायी मार्ग  वाशिम कडुन मालेगाव जाण्याकरीता मंगरूळपीर,शेलूबाजार  मार्गे मालेगांव. मालेगाव कडून वाशिमकडे येणारी सर्व वाहतूक बंद पर्यायी मार्ग वाशिमकडुन पातुर जाणेकरीता मंगरुळपीर,शेलुबाजार बार्शीटाकळी, अकोला मार्गे पातुर. मालेगाव कडून पातुरकडे जाणारी सर्व वाहतूक बंद पर्यायी मार्ग  मेहकरकडुन वाशिम जाणेकरीता मालेगांव, शिरपुर, रिसोड मार्गे वाशिम. पातुर कडून मालेगाव व वाशिमकडे येणारी सर्व वाहतुक बंद, पर्यायी मार्ग अमरावती, यवतमाळ, कारंजाकडुन पातुर जाणेकरीता कारंजा, शेलुबाजार, बार्शीटाकळी, अकोला मार्गे पातुर. मेहकरकडुन पातुर जाणेकरीता मालेगांव, शेलुबाजार, बार्शीटाकळी, अकोला मार्गे पातुर. पदयात्रा मालेगांव येथुन मेडशीकडे निघाल्यानंतर मालेगांव बायपास अकोला नाका वरुन कारंजा ते मेहकर (नागपुर ते औरंगाबाद महामार्ग) चालणारी वाहतुक ही किमान २ तास थांबविणे.

            १७ नोव्हेंबर रोजी मालेगांवकडुन पातुरकडे जाणारी सर्व वाहतुक १० वाजता पर्यंत बंद, पर्यायी मार्ग मालेगावरुन पातुरकडे जाण्याकरीता शेलुबाजार,बार्शीटाकळी,अकोलामार्गे पातुर पर्यायी मार्गाने वळविण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस. यांनी कळविले आहे.

Related Posts

0 Response to "भारत जोडो पदयात्रा १५ ते १७ नोव्हेंबर दरम्यान वाहतूक मार्गात बदल"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article