
गोभणी येते अनिवासी कुकुट पालन प्रशिक्षण संपन्न..
साप्ताहिक सागर आदित्य
गोभणी येते अनिवासी कुकुट पालन प्रशिक्षण संपन्न..
स्टेट बँक ग्रामीण रोजगार प्रशिक्षण संस्था वाशिम येथे विविध प्रकारचे मोफत प्रशिक्षण दिली जातात. हे प्रशिक्षणे निवासी आणि अनिवासी असतात. त्यामध्ये ब्युटी पार्लर ,शिवणकाम, दुचाकी दुरुस्ती, मोबाईल दुरुस्ती, घरगुती उपकरणे दुरुस्ती, रेशीम उद्योग, पापड लोणचे मसाले बनवणे, फास्ट फूड, कुक्कुट पालन, दुग्ध व्यवसाय आणि शेळीपालन अशा विविध प्रकारचे निवासी तसेच अनिवासी प्रशिक्षण दिले जातात. सर्व प्रशिक्षण मोफत असून प्रशिक्षणार्थ्यांना तीन वेळा चहा ,एक वेळा नाष्टा, दोन वेळा जेवण आणि प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षण साहित्य मोफत दिले जाते. ब्रश, पेस्ट, साबण, तेल, नोटबुक, पेन इत्यादी सुविधा पुरविण्यात येतात. प्रशिक्षणार्थींच्या क्षेत्रभेटी, मध्य व अंतिम परीक्षा घेतली जाते.
प्रशिक्षणार्थीना व्यवसाया संबंधी "उद्योजकता कौशल्य विकास" आणि कुक्कुटपालन या विषयी तज्ञ मार्गदर्शक सखोल मार्गदर्शन करतात . याचा एक भाग म्हणून *दिनांक 14 जानेवारी 2025 23 जानेवारी 2025 या दरम्यान 10 दिवसाचे कुक्कुटपालन प्रशिक्षण ग्राम गोभणी* तालुका रिसोड येथे यशस्वीरित्या संपन्न झाले. मुख्य मार्गदर्शिका अधिव्याख्याता वनिता राघोजी गुडदे. व कुक्कुटपालन तज्ञ मार्गदर्शक श्री. ज्ञानेश्वर कदम हे होते. यात ग्रामीण भागातील बीपीएल अंतर्गत 18 ते 45 वयोगटातील एकूण 35 महिला व पुरुष सहभागी होत्या. दिनांक 24 जानेवारी 2025 रोजी एसबीआय आर सिटी वाशिम येथे परीक्षा पार पडली. या परीक्षेसाठी बाह्य तज्ञ प्रशिक्षक डॉ. अमोल अवचार व डॉ. काळे साहेब लाभले होते. संस्थेचे संचालक धनाजी बोईले, अधिव्याख्याता वनिता गुडदे मॅडम कार्यालयीन सहाय्यक योगेश ठाकूर, तेजश्री निचडे , महेंद्र समृद्ध व महादेव भोयर या सर्वांनी परीक्षेसाठी मोलाचे सहकार्य केले. शेवटी संचालकश्री. धनंजय बोयले सर यांनी वाशिम जिल्ह्यातील गरिबातल्या गरीब 18 ते 45 वयोगटातील महिला व पुरुष युवक युवती यांनी येथे चालत असलेल्या निवासी व अनिवासी मोफत प्रशिक्षणामध्ये सहभाग घ्यावा व चांगले उद्योजक बनावे असे आवाहन केले आहे.
0 Response to " गोभणी येते अनिवासी कुकुट पालन प्रशिक्षण संपन्न.."
Post a Comment