
भा.मा. कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रजासत्ताक दिन साजरा
साप्ताहिक सागर आदित्य
भा.मा. कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रजासत्ताक दिन साजरा
…. भारत माध्यमिक कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय रिसोड येथे 76 वा प्रजासत्ताक दिन आदरणीय प्राचार्या मंजुषा सु. देशमुख मॅडम यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला . वर्षभरामध्ये ज्या विविध स्पर्धा जिल्हा आणि विभागीय स्तरावर घेण्यात आल्या होत्या त्यामध्ये प्राविण्य प्राप्त विद्यार्थिनींना आदरणीय बाईसाहेब जयश्रीताई देशमुख यांच्या शुभहस्ते प्रमाणपत्र आणि शिड्स देण्यात आले. त्यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थिनींमधील सुप्त कलागुणांना यामधून वाव मिळाला. शेवटी आपल्या मनोगतुन आदरणीय प्राचार्या मंजुषा सु. देशमुख मॅडम यांनी जगातील सर्वात मोठी लोकशाही ही या संविधानाच्या अंमलबजावणीमुळे यशस्वी ठरत आहे . एकता, अखंडता आणि शांती यांनी परिपूर्ण अशी ही प्रजेची सत्ता अशीच समृद्ध होत राहवी अशा शुभेच्छा पर मनोगत व्यक्त करत सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्रा. पी.एच मोरे व आभार प्रदर्शन विजय हराळकर सर यांनी केले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे, पालक वर्ग, प्रचार्या,पर्यवेक्षक, सर्व शिक्षक, शिक्षिकाआणि शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Response to "भा.मा. कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रजासत्ताक दिन साजरा"
Post a Comment