कृषि महाविद्यालय आमखेडा येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
साप्ताहिक सागर आदित्य/
कृषि महाविद्यालय आमखेडा येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
आमखेडा - गीताई ह्युमनकाईंड डेव्हलपमेंट ट्रस्ट पुणे, द्वारा संचालित डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला संलग्नित कर्मयोगी बाबारावजी जोगदंड कृषि महाविद्यालय (अहिंसातीर्थ)आमखेडा ता. मालेगाव जि. वाशिम येथे भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. कृषि महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी ८:०० वाजता कृषि महाविद्यालय सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. माणिकराव जोगदंड यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. आमखेडा गाव व शेतकरी स्वयंपूर्ण करण्यासाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा संदेश त्यांनी दिला. खेडी स्वयंपूर्ण झाली तरच देश स्वयंपूर्ण होईल असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी रामलेक्स उद्योगसमूह पुणे चे प्रमुख राम बाबाराव जोगदंड यांनी पद्मश्री डॉ. विजय भटकर यांनी आमखेडा भेटीदरम्यान सांगितल्याप्रमाणे आमखेडा येथे जागतिक दर्जाचे कृषि विद्यापीठ स्थापन होण्यासाठी कार्य करण्याचे सांगितले. या कार्यक्रमाला संतोष जोगदंड, कृषिनिष्ठ पुरस्कार प्राप्त घनशाम माणिकराव जोगदंड, गी. ह्यु. डे. ट्रस्ट चे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश माणिकराव जोगदंड, पांडुरंग जोगदंड, सुरेश जोगदंड, सरपंच विठ्ठल जोगदंड, भागवत जोगदंड, गजानन पाचरणे, अजाबराव बनसोड, मदन जोगदंड, दत्ता जोगदंड, सौरभ जोगदंड, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस एम जाधव, कृषी तंत्र विद्यालयाचे प्राचार्य आर.पी. भोरकडे व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन कु. धनश्री खराटे व कु. वैशाली गावंडे यांनी केले.
0 Response to "कृषि महाविद्यालय आमखेडा येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा"
Post a Comment