‘किराणा दुकान, सुपर मार्केटमध्येही मिळणार वाईन; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय'
साप्ताहिक सागर आदित्य/
‘किराणा दुकान, सुपर मार्केटमध्येही मिळणार वाईन; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय'
मुंबई-किराणा दुकानात ग्राहकांसाठी अत्यावश्यक गोष्टी मिळतात, मात्र आता किराणा दुकान, सुपर मार्केटमध्ये वाईनची विक्री होणार असल्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. याबाबत राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी माहिती दिली आहे.
राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी या निर्णयाबाबत माहिती दिली आहे. महाराष्ट्रात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्येही वाईन विकण्याच्या धोरणाला परवानगी देण्यात आली असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. तसेच १ हजार चौरस फुटांपर्यंतच्या सुपर मार्केटमध्ये वाईन मिळणार असल्याचे नवाब मलिक म्हणाले आहेत. दरम्यान, हिमाचल प्रदेश आणि गोव्यामध्ये भाजपने हे धोरण स्विकारले आहे, महाराष्ट्रात या धोरणाला विरोध होत आहे, असा टोलाही मलिकांनी लगावला आहे.
शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय
किराणा दुकानात वाईन विक्रीचा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा असल्याची भूमिका महाविकास आघाडी सरकारची आहे. शेतकऱ्यांच्या फल उत्पादनावर वायनरी चालते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने या निर्णयाला परवानगी दिली आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत नव्या शिक्षण धोरणावरही चर्चा झाली असून मंत्रिमंडळाचा गट तयार करून शिफारशींचा अभ्यास करण्यात येणार असल्याचे नवाब मलिक म्हणाले.
0 Response to "‘किराणा दुकान, सुपर मार्केटमध्येही मिळणार वाईन; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय'"
Post a Comment