कलावंताच्या समस्यांकरीता पालकमंत्र्यांना विदर्भ कलावंत संघटनेचे साकडे !
साप्ताहिक सागर आदित्य/
कलावंताच्या समस्यांकरीता पालकमंत्र्यांना विदर्भ कलावंत संघटनेचे साकडे ! कारंजा - स्थानिक विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा यांचे वतीने आणि मंगरूळपिर येथील सुद्धा कलावंत मंडळीनी, बुधवार दि.२६ जाने . रोजी, हिंदुह्दयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त, मंगरूळपीर येथे मंगरुळपिर युवासेनेच्या ब्लँकेट वाटप कार्यक्रमाला आलेल्या पालकमंत्री ना.शंभूराजे देसाई यांना निवेदन देऊन १) कोरोना काळात हतबल झालेल्या सर्वच कलावंताना प्रत्येकी पाच हजार रु . अर्थसहाय्य देण्यात यावे .२) जिल्हा परिषद समाज कल्याणची वृद्ध साहीत्यीक कलाकार समिती स्थापन करण्यात यावी . तसेच ३) सन तिन वर्षापासून रखडलेल्या तिन वर्षाची बैठक एकत्र घेण्यात येवून तिन वर्षाचे कलाकारांचे मानधनाचे प्रस्ताव मंजूर करण्याबाबत लेखी निवेदन देऊन पालकमंत्री ना. शंभूराजे देसाई यांना विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा कडून लोककलावंताचे निवेदन देण्यात आले .यावेळी कारंजा शिवसेना शहर प्रमुख गणेशजी बाबरे, कारंजा युवासेना शहर प्रमुख शंभूराजे जिचकार यांचेसह विदर्भ लोककलावंत संघटना संस्थापक अध्यक्ष संजय कडोळे, अ भा नाट्य परिषद मुंबई, नियामक मंडळ सदस्य नंदकिशोर कव्हळकर, सदस्य पांडूरंग माने, मोहित जोहरापूरकर, उमेश अनासाने उपस्थित होते . पालकमंत्री ना. शंभूराजे देसाई यांनी पत्रकारांना मुलाखत देतेवेळी, कलावंताच्या समस्या लवकरच सोडविण्याचे आश्वासन दिले .
0 Response to "कलावंताच्या समस्यांकरीता पालकमंत्र्यांना विदर्भ कलावंत संघटनेचे साकडे ! "
Post a Comment