प्रजासत्ताक दिनानिमित्त,शेतकरी कुंटूबियांकडून सालाबादप्रमाणे ध्वजारोहण
साप्ताहिक सागर आदित्य/
प्रजासत्ताक दिनानिमित्त,शेतकरी कुंटूबियांकडून सालाबादप्रमाणे ध्वजारोहण
कारंजा - येथील शेतकरी तथा व्यापारी, मोहित जोहरापूरकर, दरवर्षी आपल्या, 'मोहित रमाणीका' या बागेत, राष्ट्रीय सण साजरे करीत असतात . काल २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन असल्यामुळे, आपल्या परिवार व मित्रमंडळीसह त्यांनी, सकाळी साडे आठ वाजता ध्वजारोहण करून, राष्ट्रध्वजाला सलामी देत राष्ट्रगीत गान करीत, दिवंगत प्रधानमंत्री लालबहादुर शास्त्रीजी यांच्या, 'जय जवान - जय किसान ' या घोषवाक्याला अभिप्रेत बळीराजाचे कर्तव्य पार पाडले . यावेळी, जोहरापूरकर परिवाराचे ज्येष्ठ कास्तकार असलेले शरदभाऊ जोहरापूरकर यांचे हस्ते ध्वजारोहण पार पडले . कार्यक्रमाला सौ . मंदाकिनी शरद जोहरापूर, श्रीमती सरोज देवलसी, सौ वैशाली जोहरापूरकर, मोहित जोहरापूरकर, कु चैताली सौ स्वाती सेंधवकर, दिनेश सेंधवकर, सौ रश्मी रुईवाले, राजेश रुईवाले, माया चौधरी, आशिष चौधरी, चि आदित्य, चि .यश, चि लोभस, चि शंतनु व मित्रमंडळी उपस्थित होती . विद्यार्थ्याच्या राष्ट्रिय सांस्कृतिक कार्यक्रमानंतर सर्वांना शरदभाऊ जोहरापूरकर यांनी त्यांच्या बागेतील दुर्मिळ अशा औषधी वनस्पतीची ओळख करून माहिती दिली . या कार्यक्रमाचे संचलन संजय कडोळे यांनी केले . कार्यक्रमा करीता मित्रमंडळी प्रविण करडे, श्रीकृष्ण सुरजुसे, बबनराव सावके,नंदकिशोर कव्हळकर, विजय खंडारे, कुंदन श्यामसुंदर , ज्ञानेश्वर खंडारे, उमेश अनासाने आवर्जुन हजर होती .अल्पोपहारानंतर कार्यक्रम सांगता करण्यात आली .
0 Response to "प्रजासत्ताक दिनानिमित्त,शेतकरी कुंटूबियांकडून सालाबादप्रमाणे ध्वजारोहण"
Post a Comment