प्रा.आ.केंद्र काटा येथे संध्याताई देशमुख यांचे हस्ते ध्वजारोहन संपन्न
साप्ताहिक सागर आदित्य/
प्रा.आ.केंद्र काटा येथे संध्याताई देशमुख यांचे हस्ते ध्वजारोहन संपन्न
काटा - प्रा.आरोग्य केंद्र काटा येथे नवनिर्वाचित जि. प.सदस्या तथा रुग्ण कलाम समितीच्या सहअध्यक्ष संध्याताई देशमुख यांचे हस्ते प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण संपन्न झाले.
यावेळी ध्वजारोहनांतर संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.तसेच तंबाखू मुक्तीची सार्वजनिक शपथ घेण्यात आली.तसेच संध्याताई देशमुख व प्रमुख अतिथी माधवीताई देशमुख यांचे सर्व कर्मचाऱ्यांचे वतीने श्रीमती बागळेकर व श्रीमती तायडे यांनी स्वागत केले.जि. प.सदस्या संध्याताई देशमुख यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले तसेच 15 ते 18 वयोगटातील बालकांचे लसीकरण वाढवण्यासंबंधी सूचना दिल्या.
कार्यक्रमाला वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय काळे,डॉ.अजय मैनकर,प्रवीनभाऊ देशमुख,सुनील खडसे आरोग्यसेवक देवढे, टोलमारे, आरोग्यसेविका श्रीमती बागलळेकर श्रीमती तायडे,शिवाजी देशमुख, सुडके, चंद्रशेखर,विजय खोडे श्रीमती अंभोरे आदी उपस्थित होते.
0 Response to "प्रा.आ.केंद्र काटा येथे संध्याताई देशमुख यांचे हस्ते ध्वजारोहन संपन्न"
Post a Comment