
जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा,घाटा येथे प्रजासत्ताक दिन व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न
साप्ताहिक सागर आदित्य
जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा,घाटा येथे प्रजासत्ताक दिन व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न
वाशीम जिल्ह्यातील मालेगांव तालुक्यातील घाटा येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. सकाळी 7:30 वाजता गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. प्रभात फेरी मध्ये स्वच्छता,साक्षरता,वृक्षारोपण याविषयी जनजागृती पर संदेश व घोषणा देण्यात आल्या .नंतर शाळेच्या प्रांगणात सकाळी ठीक 8:30 वाजता शाळेचे मुख्याध्यापक संभाजी साळसुंदर यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामदास सोमटकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून गावच्या सरपंच सौ.नंदाबाई प्रकाश सोमटकर,शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष अनिल दाभाडे,सदस्य पांडुरंग सोमटकर,सौ.शारदाताई इंगळे ,सौ.पूनम लांभाडे,शेख रशीद शेख चाँद,सौ.अर्चना दाभाडे,प्रभाकर सोमटकर, ग्राम पंचायत सदस्य श्यामराव इंगळे,सौ. बेबीबाई सोमटकर,सौ.सविता नंदू साबळे, मा. जि.प.सदस्य शंकरराव दाभाडे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश सोमटकर, दामूअण्णा सोमटकर,पोलीस पाटील बबन सोमटकर,से. नि.शिक्षक मुरलिधर सोमटकर, मा. सदस्य गजानन दाभाडे,शेख महेबुब शेख मुसा हे उपस्थित होते.सर्व प्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधीजी,भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोंचे पूजन करण्यात आले.नंतर शाळेच्या प्रांगणात सकाळी ठीक 8:30 वाजता शाळेचे मुख्याध्यापक संभाजी साळसुंदर यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.उपस्थितांचे गुलाबपुष्प देऊन देऊन स्वागत करण्यात आले.शाळेचे मुख्याध्यापक संभाजी साळसुंदर यांनी प्रास्ताविकामधुन स्वातंत्र्य लढा,प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व,शाळेची प्रगती याविषयी माहिती दिली.
नंतर लगेचच विद्यार्थ्यांचा बहारदार
सांस्कृतिक कार्यक्रम सुरू झाला.यामध्ये देशभक्तीपर गीते,लावणी,लोकगीते,सिनेमा गीते यांच्यावर बहारदार नृत्य सादर केले.तसेच गीतगायन,भाषणे सुद्धा झाली.
सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये वर्ग पहिला ते आठवीचे संपूर्ण विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.जवळपास ३५ नृत्य सादर करण्यात आली.सकाळी ९:०० वाजता सुरू झालेला सांस्कृतिक कार्यक्रम दुपारी १:००वाजता संपला. आपल्या मुलांचा उत्साह वाढविण्यासाठी सर्व पालक ,गावकरी मंडळी, महिला भगिनी कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होत्या . आपल्या पाल्याचा आनंद द्विगुणीत करून कार्यक्रमाची शोभा वाढविली. बक्षीस रूपाने जवळपास १२९०५ रुपये जमा झाले. संपूर्ण कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन विठ्ठल कालवे सर यांनी केले.उपस्थितांना बक्षीस देण्यास प्रोत्साहित करून रक्कम जमा करण्याचे काम रतन पट्टेबहादुर यांनी केले.ध्वज संचलन संमती पंचवाटकर यांनी केले.रांगोळी आणि विद्यार्थ्यांची वेशभूषा व मेकअप दिपाली कापसे मॅडम यांनी केला.युवा प्रशिक्षणार्थी विठ्ठल सोमटकर यांनी साऊंड सिस्टीम व इतर सर्व तांत्रिक बाबी सांभाळल्या.रतन पट्टेबहादुर सर यांनी सर्वांचे आभार मानले.सगळ्यांना चहापाणी देण्यात येऊन खाऊ वाटप करण्यात आला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शालेय पोषण आहार मदतनीस वंदना शिंदे,सौ.सत्यभामा सोमटकर,अंगणवाडी सेविका शारदाताई इंगळे,रंजना दाभाडे यांनी मोलाची मदत केली.
0 Response to " जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा,घाटा येथे प्रजासत्ताक दिन व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न"
Post a Comment