
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिज्ञा
साप्ताहिक सागर आदित्य
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिज्ञा
वाशिम ,‘राष्ट्रीय मतदार दिना’निमित्त लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची प्रतिज्ञा घेण्याचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजे वाकाटक सभागृहात आज संपन्न झाला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी उपस्थितांना प्रतिज्ञा दिली.
यावेळी उपजिल्हा निवडणुक अधिकारी राम लंके, उपजिल्हाधिकारी महसूल विरेंद्र जाधव यांच्यासह सह अन्य वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मतदारांसाठी प्रतिज्ञा
“ भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याव्दारे, प्रतिज्ञा करतो की, आल्या देशाच्या लोकशाही परंपराचे जतन करुन आणि मुक्त नि:पक्षपाती व शांततापूर्व वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करु.’’
00000
0 Response to "राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिज्ञा"
Post a Comment