-->

अजा व अज शेतकऱ्यांसाठी विशेष मोहिम

अजा व अज शेतकऱ्यांसाठी विशेष मोहिम

 


साप्ताहिक सागर आदित्य 

अजा व अज शेतकऱ्यांसाठी विशेष मोहिम


       वाशिम,  :  एकात्मिक फलोत्‍पादन विकास अभियान व राष्‍ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती प्रवर्गातील लाभार्थीचे अर्ज घेण्‍याकरीता विशेष मोहिम राबविण्‍यात येत आहे. कृषी सहाय्यकामार्फत प्रत्‍येक गावातील अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांचा विशेष मेळावा आयोजित करून योजनेची माहिती देण्‍यात येत आहे. मोहिम स्‍वरूपात शिबीर घेऊन शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्‍याकरीता सर्व शेतकऱ्यांनी या घटकाचा लाभ घेण्‍यासाठी महाडीबीटी पोर्टलवर mahadbtmahait.gov.in या संकेतस्‍थळावर राष्‍ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत संरक्षित शेती, कांदाचाळ उभारणी, शेततळे अस्‍तरीकरण, पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटीका व एकात्मिक फलोत्‍पादन विकास अभियान योजनेअंतर्गत मसाला पिके, जुन्‍या फळबागांचे पुनरूज्‍जीवन, सामुहिक शेततळे, शेततळे अस्‍तरीकरण, शेडनेट हाऊस, पॉलीहाऊस, प्‍लॉस्‍टीक मल्‍चींग, मधुक्षिका पालन, यांत्रिकीकरण, (ट्रॅक्‍टर, पॉवर टिलर व इतर अवजारे/उपकरणे), पॅक हाऊस, कांदाचाळ, मशरूम या घटकाखाली अर्ज करावे. योजनेच्‍या अधिक माहितीसाठी जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी आरिफ शाह यांनी केले आहे.



Related Posts

0 Response to "अजा व अज शेतकऱ्यांसाठी विशेष मोहिम"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article