
गीता ज्ञान विद्यामंदिर पांगरी नवघरे इंग्लिश स्कूल येथे महिला दिन साजरा
साप्ताहिक सागर आदित्य
गीताज्ञान विद्या मंदिर पांगरी नवघरे येथे महिला दिनानिमित्त महिलांना भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. - मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे येथील गीता ज्ञान विद्यामंदिर पांगरी नवघरे इंग्लिश स्कूल येथे महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष गीताज्ञान विद्यामंदिराच्या सचिव सौ मोनालिसा पंडित नवघरे मॅडम ह्या होत्या. तसेच महिला दिनानिमित्त शाळेचे अध्यक्ष पंडित नवघरे साहेब यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.तसेच प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले अंगणवाडी सेविका सौ शोभा नवघरे मॅडम,अंतकला नवघरे, द्वारकाबाई नवघरे,यशोदाबाई नवघरे कासाबाई नवघरे, लक्ष्मीबाई नवघरे,संगीताबाई नवघरे,अनिता बाई नवघरे, भागीरथी नवघरे ह्या होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या मुख्याध्यापिका सोनाली बोरकर मॅडम यांनी केले. तसेच महिला दिनानिमित्त मार्गदर्शनपर मैंदकर मॅडम यांनी भाषण केले. तसेच महिला दिनानिमित्त अंगणवाडी सेविका सौ शोभा नवघरे मॅडम यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दिपाली मॅडम यांनी केले. व या कार्यक्रमासाठी गावातील बहुसंख्य महिलांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घेतला.तसेच कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य शाळेचे शिक्षक नागरे सर, शाळेचे कर्मचारी भाऊराव नवघरे, राजामती नवघरे, यांच्या परिश्रमाने हा कार्यक्रम व्यवस्थित रित्या पार पडला.
0 Response to "गीता ज्ञान विद्यामंदिर पांगरी नवघरे इंग्लिश स्कूल येथे महिला दिन साजरा"
Post a Comment