
जलतारा योजना पाणीटंचाईवर प्रभावी उपाय दहा आठवड्यात दहा लक्ष जलतारा उभारण्याचे निर्धार : जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस
साप्ताहिक सागर आदित्य
जलतारा योजना पाणीटंचाईवर प्रभावी उपाय
दहा आठवड्यात दहा लक्ष जलतारा उभारण्याचे निर्धार : जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस
वाशिम, दि. 13 मार्च (जिल्हा माहिती कार्यालय) – वाशिम जिल्ह्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी जलतारा योजना प्रभावी ठरत आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात पुढील 10 आठवड्यात 10 लाख जलतारा तयार करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. आणि उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांनी मौजे जनुना सोनवळ (ता. वाशिम) येथे भेट देऊन ग्रामस्थांना योजनेची माहिती दिली. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून जलतारा उपक्रमाचे महत्त्व समजावून सांगितले.तसेच अग्रीस्टॅक योजनेतही सर्वांनी फार्मर आयडीची नोंदणी करून घेण्याबाबत आवाहन करण्यात आले.यावेळी जलतारा खोदणीच्या उपक्रमाचा शुभारंभ पूजन व श्रमदान करून करण्यात आला.
जलतारा योजनेंमुळे भूजल पातळी वाढून पाण्याची टिकाऊ उपलब्धता राहणार आहे. शेतीसाठी सिंचनाची सुविधा उपलब्ध होईल, पावसाचे पाणी साठवता येईल आणि पाणीटंचाईच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय होणार आहे.
याप्रसंगी तहसीलदार वाशीम निलेश पळसकर , तालुका कृषी अधिकारी अतुल जावळे , ग्राम महसूल अधिकारी श्री गावंडे, श्री सडके महसूल मंडळ अधिकारी पांडुरंग मापारी , कृषी सहाय्यक, ग्रामपंचायत अधिकारी आणि पाणी फाउंडेशनचे अध्यक्ष सुभाष नानवटे पोलीस पाटील ,संतोष चौधरी उपस्थित होते.विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे आयोजन या गावाचे रहिवासी असलेले प्रशासनातील ग्राम महसूल अधिकारी व्ही जी राठोड तसेच गावकरी मंडळी यांनी स्वयंफुर्तीने यांनी केले होते यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष राठोड माजी पंचायत समिती सदस्य प्रेमसिंग राठोड यांचे विशेष सहकार्य लाभले.
प्रशासनाच्या आवाहनानुसार, शेतकऱ्यांनी या उपक्रमात सहभाग घेऊन जलतारा खोदणीसाठी पुढाकार घ्यावा, जेणेकरून भविष्यात पाण्याची समस्या निर्माण होणार नाही.
0 Response to "जलतारा योजना पाणीटंचाईवर प्रभावी उपाय दहा आठवड्यात दहा लक्ष जलतारा उभारण्याचे निर्धार : जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस "
Post a Comment