
भारत कन्या कनिष्ठ महाविद्यालय मध्ये मोफत स्पर्धा परीक्षा, (पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण),पार्लर ,फॅशन डिझाईन , बेकरी मार्गदर्शन वर्गाचे उदघाटन
साप्ताहिक सागर आदित्य
भारत कन्या कनिष्ठ महाविद्यालय मध्ये मोफत स्पर्धा परीक्षा, (पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण),पार्लर ,फॅशन डिझाईन , बेकरी मार्गदर्शन वर्गाचे उदघाटन
भारत माध्यमिक कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय रिसोड दिनांक 18 मार्च 2025 रोजी इयत्ता दहावी च्या विद्यार्थिनींकरिता स्पर्धा परीक्षा( पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण ) फॅशन डिझाईनिंग, ब्युटी पार्लर, केक बेकरी इत्यादी मोफत प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन भारत कन्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या आदरणीय मंजुषा सु.देशमुख मॅडम यांच्या शुभहस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून मेजर माजी सैनिक सिताराम फुके हे होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून या स्पर्धा परीक्षा व कौशल्यावर आधारित असलेल्या प्रशिक्षणाचा उद्देश आणि हे प्रशिक्षण विनामूल्य असून कुठल्याही प्रकारची फी घेतली जात नाही तळागाळातल्या विद्यार्थिनींना याचा लाभ मिळावा असा.प्रा. गुलाब एस.साबळे सर यांनी हा प्रशिक्षण घेण्याचा उद्देश आहे असे विधान केले. प्रमुख अतिथी म्हणून मेजर रामदास फुके माजी सैनिक यांनी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण संपूर्ण मैदानी तयारी करून घेण्याचा मानस व्यक्त केला. शेवटी अध्यक्षीय मार्गदर्शनातून आदरणीय प्राचार्य सौ. मंजुषा सु.देशमुख मॅडम यांनी विद्यार्थिनींना या प्रशिक्षणाच्या माध्यमातून भावी प्रशासकीय अधिकारी घडाव्यात हीच आमची गुरुदक्षिणा ठरेल असा सूचक सल्ला देऊन विद्यार्थीनीनी या संधीचं सोनं करावं असा मूलमंत्र दिला. या कार्यक्रमासाठी शाळेचे शिक्षक प्रा.पी.एच. मोरे ,प्रा. एस. ओ. चोमवाल, प्रा.जी.बी. वाझुळकर, प्रा.अभिषेक तिकाईत , प्रा.पंजाब पानझाडे, प्रा. दीपिका पुंड,प्रा. विजया कोटकर, प्रा.साधना बोरकर, प्रा.विजयमाला आसणकर, पायघन सर इत्यादी शिक्षक शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्रा. गुलाब साबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.अभिषेक यांनी केले. नुकत्याच दहावीच्या परीक्षा दिलेल्या असंख्य विद्यार्थिनींची उपस्थिती या कार्यक्रमाला होती.
0 Response to "भारत कन्या कनिष्ठ महाविद्यालय मध्ये मोफत स्पर्धा परीक्षा, (पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण),पार्लर ,फॅशन डिझाईन , बेकरी मार्गदर्शन वर्गाचे उदघाटन "
Post a Comment