वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे लोकशाही पद्धतीने विद्यार्थी मंत्रीमंडळ स्थापन ।।
साप्ताहिक सागर आदित्य
वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे लोकशाही पद्धतीने विद्यार्थी मंत्रीमंडळ स्थापन ।। विद्यार्थी यांना भारतातील मतदान प्रक्रिया गुप्त मतदान कशा प्रकारे राबवली जात आहे याची माहिती व्हावी म्हणून शाळेचे मुख्याध्यापक प्रसेन भगत यांनी मतदान पद्धती वापरून विद्यार्थी प्रतिनिधी मंत्री मंडळ निवडणूक आयोजित करण्यात आली असता एकुण पंधरा विद्यार्थी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते त्यामधे ईयता दहावीचा विद्यार्थी रामेश्वर चव्हाण प्रधानमंत्री म्हणुन सर्वाधिक मतेमिळून निवडुण आला तर विद्यार्थीनी उपप्रमुख म्हणुन कोमल सोनोने, सांस्कृतिक कार्यक्रम मंत्री म्हणून चंचल चव्हाण, क्रीडामंत्री म्हणुन खेमराज राठोड, स्वच्छता मंत्री पदी चेतन मनवर, क्रीडा उपप्रमुख वेदांत कदम यांना नियुक्ती करत शपथ ग्रहण करून शालेय कामकाज सुरळीत चालू राहण्यासाठी हमी दिली आणि सर्व वर्गांचे वर्ग प्रमुख सुध्दा मतदान पद्धतीने निवडण्यात आले असून या सर्व निवडणूक प्रक्रिया साठी शाळेच्या जेष्ठ शिक्षिका सरोज देशमुख, निवडणूक अधिकारी 1, विद्यारथी ओळख पत्रावरून ओळख पेटविली, वैशाली चातुरकर यांनी निवडणूक अधिकारी 2 विद्यार्थी यांच्या नाव व स्वाक्षरी घेतली, तर सविता भालेराव यांनी विद्यार्थी यांच्या बोटाला शाई लावून मत पत्रीका दिली, तर बुथ क्रमांक2 वर ज्योती इंगोले यांनी अधिकारी 1 म्हणुन, तेजस्विनी इंगळे यांनी अधिकारी 2, रूपेश जयस्वाल यांनी अधिकारी 3 म्हणुन काम पाहिले केंद्राधयक्ष म्हणुन मुख्धयापक प्रसेन भगत यांनी काम पाहिले या सर्व मतदान प्रक्रियेत विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रिया कशी असते याची माहिती झाली आणि विद्यार्थ्यांना खुप छान आनंद झाला असून विजयी उमेदवार यांनी आनंद व्यक्त केला या निवडणुक प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक अनंत खडसे, चंद्रशेखर वानखडे, विजयश्री सरनाईक, सतिश भगत, विकलसींग राठोड, निलेश उजवे, यांनी परीश्रम घेतले शेवटी विजयी विद्यार्थी यांचा मुख्याध्यापक यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला,
0 Response to "वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे लोकशाही पद्धतीने विद्यार्थी मंत्रीमंडळ स्थापन ।।"
Post a Comment