
मौजे.कोयाळी ( बु ) ते मन्नास पिंपरी शिव रस्ताकडे शासनाने लक्ष द्यावे - गोपाल भिसडे
साप्ताहिक सागर आदित्य
मौजे.कोयाळी ( बु ) ते मन्नास पिंपरी शिव रस्ताकडे शासनाने लक्ष द्यावे - गोपाल भिसडे
रिसोड तालुक्यातील मौजे कोयाळी( बु )रिठद गावापासून एकूण 5 किलोमीटर असलेला रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचा झालेला आहे, या रस्त्यावर कुणाचेच लक्ष नाही,या रस्त्याने ये जा करण्याऱ्या वाहणाची संख्या मोठया प्रमाणात आहे, आणि रस्ता संपूर्ण सुरुवातीपासून शेवटपर्यंत खराब झालेला आहे, कमी दिवसात या रस्त्याची भयंकर अवस्था झालेली आहे,शेतकरी वर्गाला शेतात जाण्यासाठी दररोज गेली पाच वर्ष झाले त्रास सहन करावा लागत आहे, हा रस्ताची दयनीय अवस्था झालेली आहे, कोयाळी( बु )पासून पिंपरी, गोरेगाव, सेनगाव,जातांना हा रस्ता लागतो, आणि त्यांना कोयाळी, वाशिम येण्यासाठी सुद्धा हाच रस्ताने यावे लागते, पाच किलोमीटर रस्ता ये जा करणाऱ्या 1 तास लागतो, संपूर्ण रस्ता खड्डेमय झाला आहे,जीवघेणा रस्ता झालेला आहे, हिंगोली जिल्हातील मौजे. मन्नास पिंपरी, गोरेगाव, गुगुळ पिंपरी, सेनगाव, आजेगाव, जामठी, चोंढी या गावातील विद्यार्थ्यांना हा रस्ता पार करून कोयाळी ( बु ) गावी शिक्षण घेण्यासाठी दररोज यावे लागते, विध्यार्थीनी असतील विध्यार्थी असतील, सर्वाना हा रस्ता अतिशय महत्वाचा झालेला आहे, दुसरा मार्ग यायला जायला नाही, मालगाड्या असतील शेतातून गावी माल आणण्यासाठी प्रचंड जोखीम करत त्यांना या रस्त्याचा त्रास सहन करावा लागत असून त्याअनुषंगाने शासनाने या रस्त्याकडे लक्ष देण्याची गरज असून हा रस्ताचे काम तातडीने चालू करावे, या रस्त्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी समस्त ग्रामस्थमंडळी कोयाळी ( बु ) यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते गोपाल भिसडे यांनी केली
आहे,,
आहे.
0 Response to "मौजे.कोयाळी ( बु ) ते मन्नास पिंपरी शिव रस्ताकडे शासनाने लक्ष द्यावे - गोपाल भिसडे"
Post a Comment