नारायणा किड्स मध्ये रक्षाबंधन ऍक्टिव्हिटी उत्साहात साजरी
साप्ताहिक सागर आदित्य
नारायणा किड्स मध्ये रक्षाबंधन ऍक्टिव्हिटी उत्साहात साजरी
आज दिनांक १७/८/२४ रोजी Nursery to Ukg च्या विद्यार्थ्यांसाठी रक्षाबंधन ऍक्टिव्हिटी आयोजित करण्यात आली.🌳🌳
हिरवीगार झालं डोळ्यांना व मनाला शांतता देतात. झाडावर निरनिराळे पक्षी येतात.
झाड स्वतः अंगावर ऊन झेलून आपल्याला सावली देत असत. इतकंच नव्हे तर आपलं जीवनच वृक्ष वनस्पतीवर अवलंबून असतं, ही भावना मनात ठेवून वृक्षवल्ली यांच्याप्रती कृतज्ञता भाव व्यक्त करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी शालेय परिसरातील सर्व झाडांची निगा राखून त्यांना राखी बांधली केवळ आजच्या दिवशीच नव्हे तर प्रत्येक दिवशी झाडाचे संगोपन व पालन पोषण करण्याची सर्व शिक्षकांनी सोबतच विद्यार्थ्यांनी सुद्धा जबाबदारी घेतली. निसर्गाप्रति आपल्या भावना व कर्तव्य यांची जाणीव सर्व विद्यार्थ्यांना लहान वयापासून व्हावी यासाठी अशा निराळ्या रक्षाबंधन Activity चे आयोजन करण्यात आले या प्रसंगी शाळेचे अध्यक्ष माननीय अनिल धुमकेकर सर व सौ. आरती धुमकेकर मॅडम यांच्यासह शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री पाचपोर, मीनाक्षी सराटे, सारिका धुमकेकर प्रसंगी उपस्थित होते. शाळेचे शिक्षक व शिक्षिका रजनी ठाकरे, सोनाली भांदुर्गे, साधना राठोड, राणी चौधरी, पूजा पुरोहित, वैष्णवी पद्मने, स्वाती सुर्वे, रूपाली जाधव, तसेच शिक्षकेतर कर्मचारी शंतनु, उषाताई, राधिकाताई, ज्योती ताई, यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
0 Response to "नारायणा किड्स मध्ये रक्षाबंधन ऍक्टिव्हिटी उत्साहात साजरी"
Post a Comment