
हिंदवी आंबेकरला कराटे स्पर्धेमध्ये स्वर्णपदक! शोतोकान कराटे डू असोसिएशन आॅफ इंडियाच्या वतीने
साप्ताहिक सागर आदित्य
हिंदवी आंबेकरला कराटे स्पर्धेमध्ये स्वर्णपदक!
शोतोकान कराटे डू असोसिएशन आॅफ इंडियाच्या वतीने घेण्यात येणार्या कराटे स्पर्धेत वाशिम येथील हिंदवी शंकर आंबेकर (९वर्ष) हिने स्वर्णपदक पटकावले. शोतोकान कराटे डू असोसिएशन आॅफ इंडियाच्या वतीने दिनांक 20 व 21 जानेवारी 2024 रोजी जिल्हा क्रीडा संकुल वाशिम येथे नॅशनल कराटे चॅम्पियनशिप स्पर्धा 2024 चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी देशातील विविध राज्यातून स्पर्धक आले होते, ज्यात मध्य प्रदेश, कर्नाटक, गुजरात, झारखंड, उत्तर प्रदेश, हरियाणा इत्यादी राज्याचा समावेश होता. या राष्ट्रीय स्पर्धेत वाशिम येथील हिंदवी शंकर आंबेकर हिने ९ वर्ष वयोगटात बेस्ट फायटर म्हणून सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेत फायटिंग मध्ये हिंदवी ला रजत पदक आणि काता स्पर्धेमध्ये कांस्य पदक असे एकुण तीन पदके पटकावत हिंदवीने या राष्ट्रीय स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन केले. तिच्या यशाचे श्रेय तीने तिचे गुरु आणि कोच निखिल देशमुख आणि कोच सुनील देशमुख यांना दिले. कोच निखिल देशमुख यांच्या मार्गदर्शनात कुमारी हिंदवी हिने मागील वर्षी सुद्धा नाशिक येथे झालेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत २ सुवर्णपदक पटकावली होती. तिच्या या यशाबद्दल समाजाच्या सर्व स्तरातून तिचे अभिनंदन होत आहे.
0 Response to "हिंदवी आंबेकरला कराटे स्पर्धेमध्ये स्वर्णपदक! शोतोकान कराटे डू असोसिएशन आॅफ इंडियाच्या वतीने "
Post a Comment