-->

प्रल्हाद पै यांचे दोन दिवस समाज प्रबोधन शिबिर ज्ञानेश्वर महाराज पुण्यस्मरण सोहळा

प्रल्हाद पै यांचे दोन दिवस समाज प्रबोधन शिबिर ज्ञानेश्वर महाराज पुण्यस्मरण सोहळा

 


साप्ताहिक सागर आदित्य 

प्रल्हाद पै यांचे दोन दिवस समाज प्रबोधन शिबिर ज्ञानेश्वर महाराज पुण्यस्मरण सोहळा


  'जीवनविद्या मिशन'च्या वतीने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा पुण्यस्मरण सोहळा तसेच सद्गुरू वामराव पै यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने समाज प्रबोधन शिबिर घेतले जात आहे. यवतमाळातील शिवाजी मैदानावर २७ व २८ जानेवारी रोजी संध्याकाळी ४:३० ते ८ या वेळेत हे शिबिर होणार आहे. जीवनविद्या मिशनचे आजीव विश्वस्त प्रल्हाद पै स्वतः यात मार्गदर्शन करणार आहे. 'आजि सोनियाचा दिनू आणि सर्वात श्रेष्ठ राष्ट्रहित' यावर प्रल्हाद पै प्रबोधन करणार आहेत, अशी माहिती नामसाधक दशरथ शिरसाठ यांनी दिली.


सद्‌गुरू वामनराव पै यांनी जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून सक्षम समाज व सुखी जीवनाचा मूलमंत्र दिला आहे. आज मिशनच्या माध्यमातून मोफत मार्गदर्शन शिबिर घेतली जातात. विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन वर्ग, कॉर्पोरेटमध्ये काम करणाऱ्यांमध्ये 'लव्ह वर्क, एन्जॉय लाईफ', वृक्षारोपण उपक्रम, अवयव दान अभियान, पोलिसांनी, कैद्यांना मार्गदर्शन यातून सर्वांमध्ये सकारात्मक बदल कसा येईल, यावर मिशन काम करत आहे. मिशनच्या देशाबाहेर चार शाखा तर देशांतर्गत एकूण ७२ शाखा कार्यरत आहेत, असे दशरथ शिरसाठ यांनी सांगितले.


मिशनचे आवाहन


जीवनविद्येचा


प्रचार-प्रसार करण्यासाठी व लोक सुखी व्हावेत, या शुद्ध भावनेतून मुंबई, नागपूर, पुणे, अचलपूर येथून


प्रल्हाद पै मलकापूर,


१३० नामसाधक यवतमाळात आले आहेत. यवतमाळवासीयांनी या प्रबोधन शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जीवनविद्या मिशन विश्वस्त मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.


ज्ञानेश्वर माउली पुण्यस्मरण व सद्‌गुरूंच्या जन्मशताब्दी महोत्सवात प्रबोधन पुष्प गुंफले जात आहे. याची सुरुवात नागपूर, मुंबई, कन्हाड, सातारा अशी झाली. आता चौथे पुष्प यवतमाळात गुंफण्यात येत आहे.


जीवनविद्या मिशनकडून अंधश्रद्धा निर्मूलन, व्यक्तीपूजेपेक्षा व्यक्तिमत्त्व विकास यावर भर दिला जातो. 'कृपा' या संकल्पनेत स्वतः कर आणि पाहा याचा समावेश आहे. व्यक्तीने समाज हिताला सर्वोच्च मानून त्यादृष्टीने काम करावे, सर्वांचे भलं कर ही भावना ठेवावी, यात आपोआपच आपलंही भलं होतं हा सद्‌गुरूंचा संदेश सामावलेला आहे. पत्रपरिषदेला जीवनविद्या परिवारातील नामसाधक सेवानिवृत्त पोलिस अधिकारी श्रीराम मूल्यमवार, प्रकाश वीरकर आदी उपस्थित होते.

0 Response to "प्रल्हाद पै यांचे दोन दिवस समाज प्रबोधन शिबिर ज्ञानेश्वर महाराज पुण्यस्मरण सोहळा"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article