
जेष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तिंना सहाय्यक साधने व कृत्रिम अवयवाचे वाटप
साप्ताहिक सागर आदित्य
जेष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तिंना सहाय्यक साधने व कृत्रिम अवयवाचे वाटप
समाजकल्याण विभागामार्फत तपासणी शिबीराचे आयोजन
वाशिम
जिल्ह्यातील दिव्यांगांना आधुनिक व ज्येष्ठ नागरिकांना मोफत कृत्रिम अवयव व साहित्य वितरण करण्याकरिता जिल्हा परिषदेच्या वतीने तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी मारुती वाठ यांनी दिली.
भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाचा दिव्यांग सशक्तिकरण विभागाच्या वतीने दिव्यांग व्यक्तींना आणि ज्येष्ठ नागरिकांना मोफत कृत्रिम अवयव व साहित्य वितरण करण्याच्या अनुषंगाने दिनांक 3 ते 5 मार्च दरम्यान मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील नालंदा नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या शिबिरामध्ये पात्र लाभार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
इंडियन ऑइल कार्पोरेशन यांच्या सीएसआर फंडामधून सदर कृत्रिम अवयव व इतर साहित्य वाटप करण्यात येणार आहे. सुरुवातीला वाशिम, मंगरूळपीर आणि कारंजा या तालुक्यातील लाभार्थ्यांचे अनुक्रमे 3, 4 व 5 मार्च रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत वाशिम येथे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत वरील तीनही तालुक्याचे गट विकास अधिकारी यांना पत्र देण्यात आले असुन वरील तारखांनुसार तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांना शिबीरास उपस्थितीबाबत व जनजागृतीबाबत सुचना देण्यात आल्या आहेत.
तपासणी शिबिरामध्ये येताना दिव्यांग लाभार्थ्यांनी दिव्यांगत्वाचे एवढी आयडी प्रमाणपत्र किंवा यु डी आय डी साठी नोंदणी केल्याची स्लिप, मासिक उत्पन्न बावीस हजार पाचशे किंवा त्यापेक्षा कमी असल्याचा दाखला, आधार कार्ड झेरॉक्स, दिव्यांगत्वदर्शक एक फोटो आणि शंभर टक्के अंध असलेला भारतीय स्मार्टफोन करिता मॅट्रिकोत्तर तसेच उच्च शिक्षणाचा दाखला सोबत आणावा. तसेच ज्येष्ठ नागरिकांनी मासिक उत्पन्न 15000 किंवा त्यापेक्षा कमी असल्याचा दाखला आधार कार्डची झेरॉक्स प्रत आणि एक फोटो सोबत आणणे बंधनकारक असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने कळविले आहे.
-----------------------------------------
दिव्यांग सशक्तिकरण विभाग, सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार यांच्यामार्फत निशुल्क शिबीर व कृत्रिम अवयव वितरित करण्यात येणार आहेत. याबाबत पंचायत समिती व ग्राम पंचायत प्रशासनाच्या वतीने गाव स्तरावर मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी जेणेकरुन गरजु व्यक्तींना याचा लाभ मिळेल.
-वैभव वाघमारे, सीईओ, जिल्हा परिषद
-----------------------------------------
0 Response to "जेष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तिंना सहाय्यक साधने व कृत्रिम अवयवाचे वाटप"
Post a Comment