
जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा घाटा येथे जागतिक महिला दिन साजरा...
साप्ताहिक सागर आदित्य
जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा घाटा येथे जागतिक महिला दिन साजरा...
जि.प.व प्राथ.शाळा घाटा येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ.नंदाताई प्रकाश सोमटकर तर प्रमुख पाहुणे म्हणून अंगणवाडी सेविका शारदा शामराव इंगळे हयांनी स्थान ग्रहण केले या कार्यक्रमाला गावातील सर्व माता पालकांनी हजेरी लावली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संभाजी साळसुंदर सर यांनी केले. निपुण भारत कार्यक्रमाबद्दल सविस्तर माहिती सांगितली. याप्रसंगी लिडर मातांनी महिला दिनानिमित आपले मन व्यक्त केले. उत्कृष्ट काम करणाऱ्या सर्व पालक मातांचा पुष्पगुच्छ आणि भेटवस्तु देउन सन्मान करन्यात आला. निपूण, प्रतिज्ञा ही घेण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन कु. कापसे मॅडम यांनी केले. तर आभार प्रदर्शन पटटेबहादूर सर यांनी केले. कार्यक्रमाची उत्कृष्ट तयारी करण्याची जबाबदारी पंचवाटकर सर यांनी पार पाडली. अंततः चहा आणि फराळाचे वाटप शालेय पोषण आहार मदतनीस सौ.सत्यभामा सोमटकर,श्रीमती वंदना शिंदे यांनी करून कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यक्रमाला
सौ.लक्ष्मी अशोक राउत,सौ.गीता गजानन घोडे,सौ. लता किरण जामकर,सौ.पल्लवी रवि राउत,सौ.छाया धोंडू गुंजकर
,श्रीमती पर्वती बबन सोमटकर,सौ. शोभा बबन कुटे,सौ.मालता महादेव दाभाडे , सौ.अर्चना उध्दव दाभाडे
सौ.रंजना गजानन दाभाडे,सौ.प्रिती विजय सुर्वे, सौ.सविता उद्धव दाभाडे इत्यादी महिला उपस्थित होत्या.
0 Response to "जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा घाटा येथे जागतिक महिला दिन साजरा..."
Post a Comment