माझी लाडकी बहिण योजनेचा १७ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते राज्यस्तरीय शुभारंभ
साप्ताहिक सागर आदित्य
माझी लाडकी बहिण योजनेचा १७ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते राज्यस्तरीय शुभारंभ
प्रातिनिधीक स्वरुपात जिल्हास्तरीय लाभ वितरण होणार
वाशिम, : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा शुभारंभ शनिवार, दि. १७ ऑगस्ट रोजी होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे येथून या योजनेचा शुभारंभ करणार आहेत. जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात दुपारी १२.३० वाजता जिल्हास्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी या योजनेसाठी जिल्ह्यातील पात्र ठरलेल्या महिला उपस्थित राहणार आहेत.
महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी व त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी पात्र महिलांसाठी मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला असून जिल्हास्तरीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. संजय राठोड, लोकसभा सदस्य खा. संजय देशमुख,अनुप धोत्रे,विधान परिषद सदस्य आ.अॅड. किरण सरनाईक, श्रीमती भावनाताई गवळी,वसंत खंडेलवाल,धिरज लिंगाडे,विधानसभा सदस्य आ.लखन मलीक, अमित झनक,जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस.,जिल्हा पोलिस अधीक्षक अनुज तारे, मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण तथा जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय जोल्हे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी निवृत्ती जटाळे, बाल विकास प्रकल्प अधिकारी मिनाक्षी भस्मे यांनी कळविले आहे.
0 Response to "माझी लाडकी बहिण योजनेचा १७ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते राज्यस्तरीय शुभारंभ"
Post a Comment