-->

स्वच्छता ही सेवा:  इंझोरी येथे वृक्षारोपण, सिंगल युज प्लास्टिकचे श्रमदानाद्वारे संकलन

स्वच्छता ही सेवा: इंझोरी येथे वृक्षारोपण, सिंगल युज प्लास्टिकचे श्रमदानाद्वारे संकलन



साप्ताहिक सागर आदित्य 

 स्वच्छता ही सेवा:

इंझोरी येथे वृक्षारोपण, सिंगल युज प्लास्टिकचे श्रमदानाद्वारे संकलन

ग्रामपंचायत इंझोरी येथे स्वच्छता ही सेवा कार्यक्रमांतर्गत (दि२२) वृक्षारोपण, स्वच्छता विषयी प्रबोधन आणि भव्य स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

ग्राम पंचायतीच्या वतीने श्रमदानाद्वारे सिंगल युज प्लास्टिकचे  संकलन करण्यात आले आणि गाव प्लास्टिक निर्मूलन करण्याची शपथ घेण्यात आली.  जिल्हा परिषद शाळेमध्ये संत गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य विनादेवी अजय जैस्वाल, गट विकास अधिकारी हरिनारायण परिहार, ग्रामपंचायतचे  सरपंच हिम्मतराव राऊत, शेषराव  नागोलकर, जिल्हा कक्षाचे शंकर आंबेकर, प्रफुल काळे यांची उपस्थिती होती.

स्वच्छता रथासह लोककलावंतांनी केली जनजागृती:

सावच्छता ही सेवा या अभियानांतर्गत जिल्हा पराषदेच्या वतीने स्वच्छता रथासह पारंपरिक लोककलावंताच्या माध्यमातुन प्रभावीपणे जनजागृती करण्यात येत आहे. इंझोरी येथेही शाहिर धम्मानंद इंगोले आणि त्यांच्या संचाने आपल्या विनोदि शैलीतुन शाळेतील विद्यार्थी व ग्रामस्थांचे प्रबोधन केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य दिगंबर इंगळे, सूर्यभान मडावी, मनीषा दिघडे,  जिल्हा परिषद शाळेचे मुख्यध्यापक दीपक ढोक,बीआरसी कक्षाचे अमोल घोडे, जि.प. शाळेतील शिक्षक तसेच मुंगसाजी विद्यालयाचे सर्व शिक्षक व सर्व विद्यार्थी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, बचत गटाच्या महिला, आशा वर्कर, ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता.

Related Posts

0 Response to "स्वच्छता ही सेवा: इंझोरी येथे वृक्षारोपण, सिंगल युज प्लास्टिकचे श्रमदानाद्वारे संकलन"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article