-->

मालेगाव येथील दरोडा, खून प्रकरणातील आरोपी जेरबंद!

मालेगाव येथील दरोडा, खून प्रकरणातील आरोपी जेरबंद!

 


साप्ताहिक सागर आदित्य/

मालेगाव येथील दरोडा, खून प्रकरणातील आरोपी जेरबंद!

अजाबराव पंजाबराव घुगे (४०) रा. सुकांडा ता. मालेगाव या मुख्य आरोपीला अटक केली.

वाशिम : मालेगाव येथील सराफा व्यावसायिकाच्या लुटमार व कामगार खून प्रकरणातील मुख्य आरोपीला जेरबंद करण्यात पोलीस यंत्रणेला यश आले. याप्रकरणात अजाबराव पंजाबराव घुगे (४०) रा. सुकांडा ता. मालेगाव या मुख्य आरोपीला अटक केली असून, दोन गावठी कट्टे, २.४० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी शनिवार, २५ डिसेंबर रोजी पत्रकार परिषदेत दिली.२१ डिसेंबरच्या रात्री ९ वाजताच्या सुमारास मालेगाव शहरातील अंजनकर ज्वेलर्सचे मालक योगेश अंजनकर व त्यांचे कामगार रविंद्र वाळेकर दोघेही रा. मालेगाव हे दोघे रात्री ९ वाजेच्या दरम्यान घरी बॅग घेऊन जात असताना, तीन मोटार सायकलवरून आलेल्या ५ ते ६ दरोडेखोरांनी मिरची पूड डोळयांत टाकली, चाकूने वार केले आणि गावठी कट्टयातून गोळीबार केला होता. रवींद्र वाळेकर याने दरोडेखोरांचा प्रतिकार केल्याने त्याचेवर चाकूने वार करून बंदुकिची गोळी झाडली. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला तर सराफा व्यावसायिक योगेश अंजनकर हेसुद्धा गंभीर जखमी झाले. उपचारादम्यान रवींद्र वाळेकर यांचा मृत्यू झाला. दरोडेखोरांनी योगेश अंजनकर यांचेजवळील ९ लाख न हजार रुपयांचा मुद्देमाल असलेली बॅग घेऊन दरोडेखोरांनी घटनास्थळावरून पोबारा केला होता. याप्रकरणी अज्ञात आरोपितांविरुद्ध कलम ३९६, ३९७ भादंवि मालेगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करीत आरोपीच्या शोधार्थ सहा पथके वेगवेगळ्या दिशेने रवाना करण्यात आली. मालेगाव पोलीस तथा गुन्हे शाखेच्या चमुने गोपनीय माहितीच्या आधारे तांत्रिकदृष्ट्या तपासाची चक्रे फिरवून अवघ्या ४८ तासात मालेगाव तालुक्यातील सुकांडा येथून अजाबराव पंजाबराव घुगे या मुख्य आरोपीस अटक केली. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले दोन गावठी कट्टे आणि दोन लाख ४० हजाराचे ५३ ग्रॅम सोने जप्त केले. या प्रकरणातील उर्वरीत आरोपी लवकरच पोलीसांच्या हाती येतील, असेही शेवटी पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांनी सांगीतले.मालेगाव पोलिस स्टेशन चे ठाणेदार  व  सर्व पोलिस यंत्रणेची कौतुकास्पद कामगिरी यामधून दिसून आली जनतेमध्ये असे बोलले जात आहे.




0 Response to "मालेगाव येथील दरोडा, खून प्रकरणातील आरोपी जेरबंद!"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article