
नाम फाउंडेशनच्या विदर्भ समन्वयकांची बैठक संम्पन्न
साप्ताहिक सागर आदित्य
नाम फाउंडेशनच्या विदर्भ समन्वयकांची बैठक संम्पन्न
संकटात आलेल्या शेतक-यांच्या घरापर्यंत जावे लागेल - हरीश इथापे अं
वर्धा: संपूर्ण जगाचं पोट भरणा-या शेतकर्यांच्या परिवारावर आज अस्मानी संकट आले असताना शेतक-यांच्या सोबतीला नाम फाऊंडेशन ताकतीने उभे आहे. शेतकरी परिवाराच्या समस्या जाणून त्या सोडविण्यासाठी अधिक चांगले काय करता येणार
त्यासाठी दि 24 सप्टेंबर 2022 रोजी मगन संग्रहालय , वर्धा येथे विदर्भातील नाम समन्वयकांची बैठक संपन्न झाली. नाम खंबीरपणे मागील आठ वर्षापासून शेतकरी परिवारासाठी मदत करत आहे. कोरोना काळात शेतक-यांनी समाजाला घास दिला परंतु हाच शेतकरी आज उपेक्षित आहे. कोरोना काळात झालेल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला नामने विदर्भ- खान्देश मधे 15 दिवसात 5 कोटी रुपये वाटप केले. त्याच बरोबर गावातील हमाल, रिक्शा चालक , अॅटोरिक्षा चालक , एकल महिला यांना विदर्भात 3500 खाद्य किट वाटप केले. शेतकरी कुटुंबाला शेळी वाटप, महिलानां शिलाई मशीन, तलावतील गाळ काढने, मुला - मुलींचे शिक्षण, स्वयं रोजगार इ. उपक्रम नामने अविरतपने सुरु ठेवले.
गाव तिथे नाम मित्र संकल्पनेतून शेतकरी परिवारा सोबत कमी वेळात समन्वय साधुन योग्य ती मदत गरजुपर्यंत पोहचावी यासाठी गाव तिथे नाम मित्र असा उपक्रम राबविल्या जाणार असे बैठकीत ठरवण्यात आले.
विदर्भ- खान्देश प्रमुख हरीश इथापे : वर्तमान स्थितीत झालेल्या अतिवृष्टि मूळे हवालदील झालेल्या शेतकरी परिवारा सोबत नाम सोबत राहनार असून नाम मित्रची महत्वाची भूमिका राहनार आहे.
बैठकीला विदर्भातील वाशीम, अश्विन सुरुशे, नागपुर, कौस्तुभ पवार, वर्धा हरीश भगत, अमरावती, वासुदेव जोशी, यवतमाल ,नितिन पवार, चांदूर बाजार संदीप ढोले, प्रदीप खो ब्रा गड़े टाकडी,दिनेश जाधव, दिनेश बुलकुंदे,राहुल इंगले,माणिक शेलके आकोला.सूरज झाड़े,समुद्रपुर, आर्वि, मारोती चवरे, स्वप्निल देशमुख, पुसद, राजेश पाहापले,वणी अखिल विरुलकर, चंद्रपुर, गजानन काळे तिवसा, यांची उपस्थिती होती. तर बैठकीला विदर्भातील नाममित्र गजु दुर्गे, वैभव जीकार, उमरेड वैभव भीसे, दिनेश जाधव समुद्रपुर,विवेक राउत ,धीरज जव ळकार धामन गाँव रेल्वे,आधार संघटनेचे जतीन रणनवरे,विक्रम खडसे,महेश पवार घाटनजी , प्रणव येवले सेलु,आशीष मेश्राम वर्धा, रुपाली काले तिवसा, मारोती चवरे वर्धा,यांची उपस्थिती होती
0 Response to "नाम फाउंडेशनच्या विदर्भ समन्वयकांची बैठक संम्पन्न"
Post a Comment