वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा... सलोखा जपणारा लोकप्रिय माणूस : मा श्री.राजेंद्रजी लहाने
साप्ताहिक सागर आदित्य
वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा...
सलोखा जपणारा लोकप्रिय माणूस : मा श्री.राजेंद्रजी लहाने
भावी आमदार माननीय लोकप्रिय मा.सरपंच श्री. राजेंद्र लहाने यांचा वाढदिवस सोहळा... सर्व प्रथम मनस्वी शुभेच्छा.
राजकारणात समाजात दोन पक्ष पहायला मिळतात मात्र त्यात मतभेद असतात मनभेद नाही त्यामुळे निवडणूक संपली की तणाव निवळला पाहिजे या मताचे लोकप्रिय मा.सरपंच श्री. राजेंद्र लहाने आहेत. जातीय सलोखा कायम जपला जावा व राखला जाईल, कुठल्याही पातळीवर इतर जातीपातीचे राजकारण कुणीही करू नये. सर्व आपण एकोपा निर्माण गुण्यागोविंदाने नांदत राहु आणि बंधुत्व कायम जोपासत एकमेकांना सहकार्य करीत राहु या भावनेने प्रेरित झालेले उमदा माणूस, दूरदृष्टी ठेवून विकासात्मक कामांना गती देणारा लोकप्रिय मा.सरपंच श्री. राजेंद्र लहाने.
यांचा राजकीय इतिहास लक्षात घेतल्यास तो संघर्षाचाच आहे. या संघर्षात वादविवाद, आरोप-प्रत्यारोप असे काही नसले तरी श्री. राजेंद्र लहाने यांनी वेगळ्या पद्धतीने संघर्ष केला आहे. राजकारणात यशस्वी व्हायचे असेल तर 'साम- दाम-दंड- भेद' आवश्यक असतो. मात्र, श्री. राजेंद्र लहाने यांचे राजकारण 'साम-दाम-दंड- भेदापलिकडे आहे. त्यांनी आपल्या स्वभावाने माणसे जिंकली आहेत. एखाद्या माणूस त्यांच्याजवळ गेला की त्याला ते आपलेसे कसे करतात हे समोरच्याच्या लक्षातही येत नाही. त्यामुळे प्रत्येकजण त्यांच्या प्रेमात पडतो. गेल्या अनेक वर्षांपासून या गावासह रिसोड मालेगांव मतदारसंघातील प्रत्येक माणसाला सकारात्मक विचारांनी प्रेरित करुन त्यांनी आपलेसे केले आहे. पक्ष, धर्म,जात-पात यांच्या भिंती आडव्या न येता त्या पलिकडे नाते दृढ करणारा असा लोकमान्य लोकप्रतिनिधी आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू आहे. विकासाबरोबरच सर्व क्षेत्रात त्यांनी नांव कमविले आहे. या मतदारसंघाचा नुसता विकास होता कामा नये तर तो विकास सर्वांगीण व्हायला हवा. हे त्यांचे तत्व, उदिष्ट आहे. म्हणून कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, पायाभूत सुविधा, सामाजिक विकास, आर्थिक विकास, शेती,जल, महिला सक्षमीकरण अशा सर्व विकासात्मक अंगांनी या परिसराचा विकास झाला पाहिजे यासाठी श्री. राजेंद्र लहाने कायम झटत आहेत. म्हणूनच ते एक लोकप्रिय अष्टपैलू लोकप्रतिनिधी किंबहुना भावी आमदार आहेत. असे लोक त्यांना म्हणतात ते यथोचित वाटते.
या शुभदिनी आपणा वाढदिवस अभिष्टचिंतनाच्या शुभेच्छा, उदंड आयुष्य आपणास लाभो हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना...🎂🎂🌹🌹🪷
0 Response to "वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा... सलोखा जपणारा लोकप्रिय माणूस : मा श्री.राजेंद्रजी लहाने"
Post a Comment