-->

संत गजाननाचे मंदिर, रंगरंगोटी आणि प्रकाशमाळांच्या रोषनाईनाईने उजळले !                                 प्रगटदिनाला दर्शनार्थीनी गर्दी न करण्याचे आवाहन

संत गजाननाचे मंदिर, रंगरंगोटी आणि प्रकाशमाळांच्या रोषनाईनाईने उजळले ! प्रगटदिनाला दर्शनार्थीनी गर्दी न करण्याचे आवाहन


साप्ताहिक सागर आदित्य

संत गजाननाचे मंदिर, रंगरंगोटी आणि प्रकाशमाळांच्या रोषनाईनाईने उजळले !                               

प्रगटदिनाला दर्शनार्थीनी गर्दी न करण्याचे आवाहन

कारंजा : स्थानिक शहर पोलिस स्टेशनच्या परिसरातील,  सर्वात प्राचिन आणि शहरातील पहिले असलेले संत गजाननाचे मंदिर, सेवाधारी भक्त मंडळीच्या निःस्वार्थ व अथक प्रयत्नामुळे, माघ वद्य सप्तमी, बुधवार दि. २३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या, श्रीं च्या प्रगटदिनाकरीता रंगरंगोटी, सजावट आणि प्रकाश माळाच्या रोषनाईने नयनरम्य असे उजाळल्याचे दिसून येत आहे . याबाबत महाराष्ट्र साप्ताहिक पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी, सेवाधारी भक्त मंडळीशी संपर्क साधला असता त्यांनी सांगीतले की, मागील वर्षी प्रथमच, कोव्हिड 19 कोरोना महामारीचे पार्श्वभूमिवर सर्वच मंदिराचे कार्यक्रम, श्रींची पालखी, नगरपरिक्रमा आणि महाप्रसाद रद्द करण्यात आलेला होता . व भक्तांना आपआपल्या घरूनच श्रींची पूजा अर्चना करण्याचे प्रत्यक्ष महाराष्ट्र शासनाचे आणि निर्बंधामुळे, संत गजानन महाराज संस्थान शेगावचे व्यवस्थापकिय विश्वस्त, संतचरणरज, ब्रम्हलिन शिवशंकरभाऊ पाटील यांचे आदेश होते . यावर्षी कोरोना निर्बधामध्ये शासनाने शिथिलता दिलेली असली तरीही कारंजा येथील श्री संत गजानन महाराज मंदिरचे सर्वच कार्यक्रम, शहरातील प्रमुख मार्गाने होणारी पालखी नगर परिक्रमा, व महाप्रसाद म्हणजेच जेवणावळी रद्द करण्यात आलेली असून प्रगटदिनाचे दिवशी मंदिरात मोजक्याच भक्त मंडळीचे उपस्थितीत सकाळी श्रींचा अभिषेक व आरती होईल.  तरी भक्तांनी नोंद घेऊन, कृपया मास्क - सॅनिटायझर्स - सामाजिक अंतर या त्रिसुत्रीचा अवलंब करून, स्वतः व आपल्या वाहनांची सुद्धा गर्दी न करता शांतता - सयंम व शिस्तीने, रांगेमध्ये उभे राहूनच दर्शन घ्यावे असे सेवाधारी भक्तमंडळीनी कळवीले आहे. 





Related Posts

0 Response to "संत गजाननाचे मंदिर, रंगरंगोटी आणि प्रकाशमाळांच्या रोषनाईनाईने उजळले ! प्रगटदिनाला दर्शनार्थीनी गर्दी न करण्याचे आवाहन"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article