-->

मौजे भट उमरा येथे प्रथम नेत्रदान कै. केशव महादुजी काळे यांचे मरणोत्तर नेत्रदान

मौजे भट उमरा येथे प्रथम नेत्रदान कै. केशव महादुजी काळे यांचे मरणोत्तर नेत्रदान

 


साप्ताहिक सागर आदित्य 

मौजे भट उमरा येथे प्रथम नेत्रदान कै. केशव महादुजी काळे यांचे मरणोत्तर नेत्रदान


मौजे भट उमरा ता. जि. वाशिम येथील डॉ. विजय दामोदर काळे यांचे काका स्व. केशव महादुजी काळे यांच्या वयाच्या ६४ व्या वर्षी दिनांक ३०/१२/२०२३ रोजी सकाळी ५:३० वाजता निधन झाले. त्यांच्या मागे बराच मोठा आप्त परिवार आहे तसेच संपुर्ण काळे कुंटुबातील आधारस्तंभ तथा सर्वाना सोबत घेऊन चालणाऱ्या तसेच समाजकार्याची आवड असलेल्या कै. केशव महादू काळे यांचे निधन झाल्याने संपुर्ण काळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर उभा असताना काळे कुंटुबीयांनी एवढया दुखामध्येही मुत्यनंतर नेत्रदान करुन दोन अंधाच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्यासाठी नेत्रदान करण्याची इच्छा संजय सदाशिव काळे याच्यांकडे व्यक्त केली त्यानूसार जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. खेळकर, नेत्र शल्यचिकित्सक, डॉ. बेदरकर, डॉ. पूरी, यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्र चिकित्सा अधिकारी श्री. ज्ञानेश्वर पोटफोडे व नेत्रदान समुपदेशक श्री. रमेश ठाकरे, यांनी स्व. केशव महादुजी काळे यांची नेत्र बुबुळे काढली व नेत्र वुवूळे त्याच दिवशी गणपती नेत्र रुग्णालय जालनाकडे पाठविण्यात आली. तरी सदरील नेत्रदान करण्याकरीता काळे कुटूबिंयाचे सहकार्य लाभले.


तरी सर्व समाजातील गणमान्य व्यक्तींनी या नेत्रदान चळवळीत सक्रीय सहभाग घेवुन नेत्रदान चळवळ ही लोक चळवळ व्हावी. मृत्यूनंतर जवळच्या व्यक्तीचे त्वरीत नेत्रदान घडवून आणावे व नेत्रदाना नंतरच मृतावर अंतिम संस्कार करावे असे अदाहन जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अनिल कावरखे यांनी केले असुन काळे कुटुंबाचे आभार मानले आहेत.


नेत्रदानासाठी संपर्क क्रं.९९२२५१९९४८ (जि.रु.वाशिम)

0 Response to "मौजे भट उमरा येथे प्रथम नेत्रदान कै. केशव महादुजी काळे यांचे मरणोत्तर नेत्रदान"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article