-->

सावित्रिबाई फुले यांच्या विचार व कार्याचा अंगिकार करावा  मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांचे प्रतिपादन

सावित्रिबाई फुले यांच्या विचार व कार्याचा अंगिकार करावा मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांचे प्रतिपादन

 


साप्ताहिक सागर आदित्य 

सावित्रिबाई फुले यांच्या विचार व कार्याचा अंगिकार करावा

मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांचे प्रतिपादन

सावित्रीबाई फुले यांच्या कार्यामुळे  महिलांना प्रगतिची दालने खुली झाली असुन आजही त्यांचे विचार व कार्य समाजाला दिशा देणारे आहे. त्यामुळे त्यांच्या विचार व कार्याचा अंगिकार सर्व स्त्री- पुरुषांनी करावा असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी केले.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेच्या वसंतराव नाईक सभागृहात त्यांना अभिवादन करण्यात आले, यावेळी पंत यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत सपकाळे, पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे, महिला व बाल विकास विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलतांना पंत म्हणाल्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने केवळ भाषण करुन चालणार नाही तर प्रत्यक्ष जीवन जगतांना त्यांच्या विचार व कार्याचा अंगिकार करणे गरजेचे आहे. आजही जिथे जिथे बालविवाह होतात, तेव्हा आपण विरोध केला पाहिजे आणि बालविवाह रोखण्यासाठी आपण प्रबोधन केले पाहिजे. समाजातील अनिष्ठ प्रथा आहेत त्यांना विरोध करुन सावित्रीबाई फुले यांचे स्त्री- पुरुष समानतेचे विचार आपण घराघरात पोचविले पाहिजे असे मत मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हारार्पण करुन अभिवादन करण्यात आले.  सोनु बाहकर,  अनिल उल्हामाले आणि राम श्रृंगारे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जिवनावर विचार व्यक्त केले. क्रांतिज्योती सावित्रीई फुले आणि महात्मा जोतिराव फुले यांच्या जीवनकार्यावर आधारीत व 5 जानेवारी रोजी प्रदर्शित होत असलेला सत्यशोधक हा चित्रपट सर्वांनी पाहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन राम श्रृंगारे यांनी केले.

प्रत्येक महापुरुषाच्या जयंती व ईतर दिनविशेषानिमित्त  जिल्हा परिषदेमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यादरम्यान केवळ हार अर्पण व पुष्प वाहण्याची औपचारिकता न करता त्या- त्या महापुरुषांच्या विचार व कार्याला उजाळा मिळावा म्हणुन उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनी त्याप्रंगी विचार व्यक्त करावे असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी दिले होते. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत सपकाळे यांनी ही परंपरा सुरु ठेवली असुन ते नेहमी कर्मचाऱ्यांना विचार मांडण्यासाठी प्रोत्साहित करीत असतात. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने सुध्दा याची प्रचिती आली आणि कर्मचाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.



0 Response to "सावित्रिबाई फुले यांच्या विचार व कार्याचा अंगिकार करावा मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांचे प्रतिपादन"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article