
कार्यकारी अभियंता आकोसकर यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार
साप्ताहिक सागर आदित्य
कार्यकारी अभियंता आकोसकर यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार जल संधारण विभागाचे कार्यकारी अभियंता आकोसकर हे नुकतेच सेवा निवृत्त झाले . त्यांनी जवळपास ३३ वर्षे सेवा दिली असून त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्यात जल संधारणची अनेक महत्वपूर्ण कामे झाल्यामुळे शेती व शेतकऱ्यांना मोठा हातभार मिळाला आहे . सेवा निवृत्ती बद्दल त्यांचा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भावपुर्ण सत्कार केला . गत काही वर्षांपूर्वी वाशीम जिल्हा अभियंता पदावर आकोसकर रुजू झाले . होते . आकोसकर हे मन मिळावू आणि अभ्यासू वृत्तीचे अधिकारी असल्यामुळे त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्यात गाळ मुक्त धरण आणि गाळ युक्त शेती हा शेतकरी हिताचा उपक्रम यशस्वी राबविण्यात आला . यामुळे शेतीला सिंचनाची सोय तर झालीच शिवाय शेतीचा दर्जा सुधारला . हजारो एकर शेती सिंचनाखाली आल्याने शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले . तसेच जिल्ह्यात अनेक बंधारे बांधन्यात आली . त्यामुळे वाहून जाणारे पावसाचे पाणी अडविण्यात आले . यामुळे कोरडवाहू शेती सिंचनाखाली आली . यासह शासनाचे अनेक प्रकल्प यशस्वी राबविण्यात आले . मात्र त्यांचा कार्यकाळ डिसेंबर मध्ये संपला . यावेळी कर्मचारी , अधिकारी यांनी आकोसकर यांचा भावपुर्ण निरोप संभारंभ आयोजित करून सपत्नीक सत्कार केला . यावेळी त्यांना निरोप देण्यासाठी केवळ अधिकारी , कर्मचारी यांनीच नव्हे तर विविध क्षेत्रातील मान्यवर , नागरिकांनी गर्दी केली होती . यावेळी विचार व्यक्त करताना आकोसकर म्हणाले की , मी माझ्या शासकीय सेवेत जनतेच्या हिताला प्राधान्य देत शासकीय योजना राबविण्यासाठी प्रामाणिक पणे प्रयत्न केले . वाशीम जिल्ह्यात जल संधारण च्या कामातून मागासलेल्या जिल्ह्यात भरीव कार्य करण्याची संधी मिळाली . यामध्ये अधिकारी , कर्मचारी यांची मोलाची साथ मिळाली . वाशीम च्या जनतेचे प्रेम कायम स्मरणात राहतील असेही ते म्हणाले .
0 Response to "कार्यकारी अभियंता आकोसकर यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार"
Post a Comment