-->

मौजे ईचोरी येथील कै. बबन चाहादुजी उंद्रे (जांभरुनकर) यांचे मरणोत्तर नेत्रदान

मौजे ईचोरी येथील कै. बबन चाहादुजी उंद्रे (जांभरुनकर) यांचे मरणोत्तर नेत्रदान

 


साप्ताहिक सागर आदित्य 

मौजे ईचोरी येथील कै. बबन चाहादुजी उंद्रे (जांभरुनकर) यांचे मरणोत्तर नेत्रदान


वाशिम येथील डॉ. जे. एम जांभरुनकर यांचे भाउ मौजे ईचोरी ता. मंगरुळपिर


जि. वाशिम येथील स्व. बबन चाहादुजी उंद्रे (जांभरुनकर) यांच्या वयाच्या ५७ व्या


वर्षी दिनांक ०४/०१/२०२४ रोजी सकाळी ११:३० वाजता अल्पशा आजाराने निधन


झाले. त्यांच्या मागे बराच मोठा आप्त परिवार आहे तसेच संपुर्ण जांभरुनकर


कुंटुबातील आधारस्तंभ तथा सर्वाना सोबत घेऊन चालणाऱ्या तसेच समाजकार्याची आवड


असलेल्या स्व. बबन चाहादुजी उंद्रे (जांभरुनकर) यांचे निधन झाल्याने संपुर्ण उंद्रे (जांभरुनकर) कुटुंबावर दुःखाचा डोंगर उभा असताना उंद्रे (जांभरुनकर) कुंटुबीयांनी एवढया दुखामध्येही मुत्यनंतर नेत्रदान करून दोन अंधाच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्यासाठी नेत्रदान करण्याची इच्छा डॉ. मंजुषा जाभरुनकर याच्यांकडे व्यक्त केली त्यानुसार जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. खेळकर, नेत्र शल्यचिकित्सक, डॉ. बेदरकर, डॉ. पूरी, यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्र चिकित्सा अधिकारी श्री. ज्ञानेश्वर पोटफोडे व नेत्रदान समुपदेशक श्री. रमेश ठाकरे, यांनी कै. बबन चाहादुजी उंद्रे (जांभरुनकर ) यांची नेत्र बुबुळे काढली व नेत्र बुबुळे त्याच दिवशी गणपती नेत्र रुग्णालय जालनाकडे पाठविण्यात आली. तरी सदरील नेत्रदान करण्याकरीता उंद्रे (जांभरुनकर) कुटूबिंयाचे सहकार्य


लाभले.


तरी सर्व समाजातील गणमान्य व्यक्तींनी या नेत्रदान चळवळीत सक्रीय सहभाग घेवुन नेत्रदान चळवळ ही लोक चळवळ व्हावी. मृत्यूनंतर जवळच्या व्यक्तीचे त्वरीत नेत्रदान घडवून आणावे व नेत्रदाना नंतरच मृतावर अंतिम संस्कार करावे असे अवाहन जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अनिल कावरखे यांनी केले असुन उंद्रे (जांभरुनकर) कुटूंबाचे आभार मानले आहेत.


नेत्रदानासाठी संपर्क क्रं.९९२२५१९९४८/८८०६८८०६४४ (जि.रु.वाशिम)


जिल्हा नेत्रशल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय वाशिम

0 Response to "मौजे ईचोरी येथील कै. बबन चाहादुजी उंद्रे (जांभरुनकर) यांचे मरणोत्तर नेत्रदान"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article