-->

दुध उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार 5 रुपये अनुदान

दुध उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार 5 रुपये अनुदान

 


साप्ताहिक सागर आदित्य 

दुध उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार 5 रुपये अनुदान


योजनेत सहभागासाठी 10 फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागविले


वाशिम, सहकारी दुध संघ व खाजगी दुध प्रकल्पांना दुध पुरवठा करणाऱ्या दुध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रतिलिटर 5 रुपये अनुदान देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.शासनाने जाहीर केलेल्या 5 रुपये प्रतिलिटर दुधाच्या अनुदान योजनेत सहभागी होण्यासाठी सहकारी दुध संघांनी व खाजगी दुध प्रकल्पांनी विहीत नमुन्यात अर्ज आयुक्त,दुग्धव्यवसाय विकास विभाग,महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडे सादर करणे बंधनकारक आहे. 

               तरी या अनुदान योजनेत सहभागी होणाऱ्या सहकारी दुध संघ व खाजगी दुध प्रकल्प यांनी डीबीटी करण्यासाठी दुध उत्पादक शेतकऱ्यांचे बँक खाते त्यांच्या आधारकार्डशी व पशुधनाच्या आधारकार्डशी (Ear Tag) संलग्न (लिंक) करणे आवश्यक आहे.या योजनेत जे दुध उत्पादक शेतकरी सहकारी दुध संघास व खाजगी प्रकल्पास दुध पुरवठा करतात,ते शेतकरी सहकारी दुध संघ व खाजगी दुध प्रकल्पामार्फत सहभागी होवू शकतात.या योजनेचा कालावधी 11 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2024 पर्यंत  आहे.

         या योजनेत सहभागी होणाऱ्या सहकारी दुध संघ व खाजगी दुध प्रकल्पांनी आपला स्वतंत्र अर्ज संपूर्ण माहितीसह ddcmaharashtra@gmail.com या ई-मेल आयडीवर सादर करावा.असे आवाहन अकोलाचे जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी डॉ.आर.एम.चव्हाण यांनी केले आहे.

                      

0 Response to "दुध उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार 5 रुपये अनुदान"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article