
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी युनियनचा आंदोलनाचा इशारा
साप्ताहिक सागर आदित्य/
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी युनियनचा आंदोलनाचा इशारा
वाशिम : अंगणवाडी कर्मचारी युनियन कडून मागण्या पूर्ण करण्यासाठी शासना सोबत संघटनेच्या अनेक मिटींग होवुन सुध्दा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा किमान मासिक वेतन पेंशन , ग्रॅज्युएटी , वाढत्या महागाई नुसार मानधन वाढ , आजार पणाच्या रजा व इतर मागण्या संदर्भात कोणत्याच प्रकारे निर्णय घेण्यात आलेले नाहीत . संपुर्ण महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचारी हे ४ डिसेंबर २०२३ पासुन बेमुदत संपावर आहेत . आंदोलना दरम्यान महाराष्ट्रातील ४ व त्यापेक्षा अधिक अंगणवाडी कर्मचाऱ्याचा मृत्यु झालेला आहे आणखी किती अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे बळी शासन घेणार आहे, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. अंगणवाडी कर्मचाऱ्याच्या सर्व मागण्या मान्य करुन त्या त्वरीत निकाली काढव्यात नाहीतर जिल्हयामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. अंगणवाडी कर्मचाऱ्याच्या मागण्या मान्य न झाल्यास किंवा अंगणवाडी कर्मचाऱ्याचा संप नोटीस देवून मोडकडीस आणल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. यावेळी सविता इंगळे जिल्हाध्यक्ष आयटक, डिगांबर अंभोरे कार्याध्यक्ष, मालती राठोड जिल्हा सचिव,सिता खिल्लारे , मंगला घुगे , अंजु वानखेडे, पार्वती रोकडे,सरला जाधव,किरण पडघान, संगिता कांबळे अनिता इंगोले,पांडे ताई, भारतीयांना गाभणे, ज्योती देशमुख, सोनल ढोबळे ,सविता उईके, मायावती डोंगरे,संगिता नवघन, लक्ष्मी गारवे,तुपोने मनोरमा गायकवाड़ या व इतर अंगणवाडी सेविका आणि मदतनिस मोठ्य संख्येने उपस्थित होत्या.
0 Response to "महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी युनियनचा आंदोलनाचा इशारा"
Post a Comment