-->

अवकाळी नुकसान भरपाई कधी मिळणार?    बाधित शेतकऱ्यांना मदतीची आस : अमोल शिंदे यांची तातडीने भरपाई देण्याची मागणी

अवकाळी नुकसान भरपाई कधी मिळणार? बाधित शेतकऱ्यांना मदतीची आस : अमोल शिंदे यांची तातडीने भरपाई देण्याची मागणी

 


साप्ताहिक सागर आदित्य 

अवकाळी नुकसान भरपाई कधी मिळणार?


बाधित शेतकऱ्यांना मदतीची आस : अमोल शिंदे यांची तातडीने भरपाई देण्याची मागणी 


वाशीम : जिल्ह्यात डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अवकाळी पावसाने ६३ हजार ९२६.५१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाकडून या नुकसानीचे सर्व्हे करून मदतीची मागणी केली आहे. मदत मिळण्यास होणारा विलंब पाहता नुकसान भरपाई कधी मिळणार असा प्रश्न बाधित शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे तातडीने  निधी मंजूर करून बाधित शेतकऱ्यांना देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस कमिटी ओबीसी सेल वाशिम तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी केली आहे. 

वाशिम जिल्ह्यात २६ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२३ दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाने रब्बी हंगामातील गहू, हरभरा, खरीपा हंगामातील तूर, कपाशी, भाजीपाला वर्गीय पिके, फळबागांचे मोठ्या प्रमाणावर झाले. जिल्ह्यात या अवेळी आलेल्या पावसामुळे रिसोड, मालेगाव व वाशीम या तीन तालुक्यात एकूण २ लाख ६ हजार १६४ शेतकऱ्यांचे ६३ हजार ९२६.५१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, या नुकसान भरपाईपोटी ७६ कोटी ३७ लाख ९८ हजार ४५८ रुपये अनुदान उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हा प्रशासनाने १९ डिसेंबर २०२३ रोजीच्या पत्राद्वारे विभागीय आयुक्तांकडे केली आहे. त्यामुळे विभागीय स्तरावरून नुकसान भरपाई रक्कमेला मान्यता देऊन ही रक्कम बाधित शेतकऱ्यांना तातडीने अदा करावी, अशी मागणी काँग्रेस कमिटी ओबीसी सेल वाशिम तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी केली आहे. 

........

शेतकऱ्याला आर्थिक आधाराची गरज 

शेतमालाला भाव नसल्यामुळे शेतकरी आधिच डबघाईस आला आहे. त्यात नैसर्गीक संकटांनी शेतकरी बेजार झाला. अवकाळी पावसाने बऱ्याच शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील हरभरा हे पीक जळून गेल्याने पुन्हा पेरणी करावी लागली. त्यामुळे आधिचीच उधारी डोक्यावर असताना दुबार पेरणीचा भुर्दंड सहन करावा लागला. या स्थितीत शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने आर्थिक आधाराची गरज असून, शासनाने तातडीने वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची मदत शेतकऱ्यांना अदा करावी अशी मागणी अमोल शिंदे यांनी केली आहे. 


0 Response to "अवकाळी नुकसान भरपाई कधी मिळणार? बाधित शेतकऱ्यांना मदतीची आस : अमोल शिंदे यांची तातडीने भरपाई देण्याची मागणी "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article