-->

प्रत्येक महिलांनी मा जिजाऊचा आदर्श घ्यावा. आद. धम्म उपासिका सीमाताई सदानंद सुर्वे.

प्रत्येक महिलांनी मा जिजाऊचा आदर्श घ्यावा. आद. धम्म उपासिका सीमाताई सदानंद सुर्वे.

 


साप्ताहिक सागर आदित्य 

प्रत्येक महिलांनी मा जिजाऊचा आदर्श घ्यावा. आद. धम्म उपासिका सीमाताई सदानंद सुर्वे.

 

मालेगाव :तालुक्यातील शेलगाव (बगाडे) येथे संबोधी बुद्ध  विहारांमध्ये पंचशील महिला मंडळ यांच्या वतीने राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांची  जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून बौद्ध उपाशीका आयुष्यमती सखुबाई सुर्वे कमलबाई राऊत व मासाहेब जिजाऊची वेशभूषा साकारलेल्या मुली कु. संबोधी सुर्वे कु. संजना सुर्वे कु.अंजली सुर्वे कु.तनुषा कंकाळ या सर्वांच्या माजिजाऊंच्या प्रतिमेला पुष्प व पुष्पहार  अर्पण करून त्रिशरण पंचशील व मासाहेब जिजाऊ वंदना ग्रहण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. प्रसंगी कु. संबोधी सुर्वे कु. संजना सुर्वे कु. अंजली सुर्वे कु. तनुशा कंकाळ या मुलींनी माजिजाऊ ची वेशभूषा साकारून सर्वांचे लक्ष वेधले व  माजिजाऊंच्या जीवनावर प्रकाश टाकीत भाषणे देऊन कार्यक्रमात एक नवीन ऊर्जा निर्माण केली .त्याचे कौतुक म्हणून उपासिका सौ .सीमा सदानंद सुर्वे यांनी या सर्व मुलींना छत्रपती शिवाजी महाराज यांचा ग्रंथ सप्रेम भेट देऊन मुलींचे कौतुक केले. तसेच सीमा सुर्वे यांनी आपल्या भाषणामध्ये महिलांना उद्देशून म्हटले प्रत्येक महिलेने जिजाऊचा आदर्श घ्यावा. घराघरात माजिजाऊ सारखी आई हवी तरच प्रत्येक घरात छत्रपती शिवाजी महाराजा सारखे छावे घडतील नंतर उपासीका लताबाई राऊत कमलाबाई राऊत कु.शुभांगी सुर्वे यांची सुद्धा भाषणे झाली. पंचशील महिला मंडळाच्या महिलांनी माजिजाऊ चे पोवाडे व गीत गाऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.  कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती गावातील उपासक बाळू वानखेडे, रमेश सुर्वे, विजानंद सुर्वे, स्वप्नील सुर्वे, देवानंद सुर्वे ,मयूर ठोके ,अतिश लबडे, आदित्य सुर्वे उपासिका  द्वारकाबाई साबळे, कांताबाई सुर्वे, सिंधुबाई सुर्वे, माया वानखेडे ,ज्योती ठोके, जिजाबाई सुर्वे ,शोभाबाई सुर्वे ,कामिनी सुर्वे ,रुक्मिणीबाई सुर्वे, मंदाकिनी खडसे, रमाबाई सुर्वे, लक्ष्मीबाई सुर्वे ,शितल सुर्वे ,प्रतिभा सुर्वे ,निर्मला राऊत, शीला गवई, वंशीला ताजने ,दिपाली राऊत, मालताबाई राऊत ,पल्लवी राऊत, इंदुबाई सुर्वे ,लक्ष्मीबाई कंकाळ, रंजना खडसे ,निकिता ताजने आदी महिला व पुरुष कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्राध्यापक सदानंद सुर्वे यांनी केले.

0 Response to "प्रत्येक महिलांनी मा जिजाऊचा आदर्श घ्यावा. आद. धम्म उपासिका सीमाताई सदानंद सुर्वे. "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article