
जी प शाळा नागरदास येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
साप्ताहिक सागर आदित्य
जी प शाळा नागरदास येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.तसेच बालिका दिन साजरा करण्यात आला.याप्रसंगी शाळेतील विद्यार्थी यांनी सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांची वेशभूषा केली.
स्त्री-शिक्षणाचा ज्यांनी रचिला पाया,
बालिकांना जगण्याचा हक्क द्याया,
सदा दिली ज्योतिबांनी साथ,
केली अनंत अडचणींवर मात,
ज्यांनी शिक्षणाची पेटवली क्रांतीज्योती,
ज्यांनी घडवली स्त्रियांची प्रगती,
भारतातील पाहिल्या शिक्षिका,
मुख्याध्यापिका,
स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या,
विद्येची जननी व समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखवणाऱ्या”
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
0 Response to "जी प शाळा नागरदास येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी"
Post a Comment