
जिल्हा नियोजन समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहिर · 20 रिक्त जागांसाठी 19 डिसेंबरला मतदान
साप्ताहिक सागर आदित्य
जिल्हा नियोजन समितीचा
निवडणूक कार्यक्रम जाहिर
· 20 रिक्त जागांसाठी 19 डिसेंबरला मतदान
वाशिम, जिल्हा नियोजन समितीच्या ग्रामीण क्षेत्रातील 20 रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समिती निवडणूक अधिकारी षन्मुगराजन एस. यांनी जाहीर केला आहे. या निवडणूकीसाठी 19 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.
21 नोव्हेंबर रोजी निवडणूकीची अधिसुचना प्रसिध्द करण्यात येईल. 22 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबरपर्यत नामनिर्देशन पत्र सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यत निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपरजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी यांचे दालनात दाखल करता येईल. 22 ते 25 नोव्हेंबरपर्यत जसजशी नामनिर्देशन पत्र प्राप्त होतील तशी दररोज नामनिर्देशन पत्रे नोटिस बोर्डवर प्रसिध्दी करण्यात येतील. 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजतापासून निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी यांचे दालनात नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात येईल. 30 नोव्हेंबर रोजी वैध नामनिर्देशन पत्राची यादी प्रसिध्द करण्यात येईल. 2 डिसेंबर रोजी सायंकाळी 5.45 वाजेपर्यत नामनिर्देशन पत्र फेटाळले गेल्यास जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील करता येईल. (नामनिर्देशन पत्र फेटाळल्याच्या दिनांकापासून दोन दिवसाच्या आत) 6 डिसेंबरपर्यत जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या अपीलावरील अंतीम निर्णयाचा कालावधी राहील. 8 डिसेंबर रोजी अपीलानंतर वैध नामनिर्देशन पत्रांची यादी प्रसिध्दी करण्यात येईल. 9 डिसेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यत उमेदवारी मागे घेता येईल. 12 डिसेंबर रोजी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द करण्यात येईल. 19 डिसेंबर रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यत जिल्हा नियोजन समिती. सभागृह नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर येथे मतदान घेण्यात येईल. 21 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजतापासून जिल्हा नियोजन समिती सभागृह वाशिम येथे मतमोजणीला सुरुवात होईल. मतमोजणी झाल्यानंतर लगेच मतदानाचा निकाल घोषित करण्यात येईल.
0 Response to "जिल्हा नियोजन समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहिर · 20 रिक्त जागांसाठी 19 डिसेंबरला मतदान"
Post a Comment